Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

दात काढल्यानंतर नवीन दात बसवणे खरंच आवश्यक आहे का...? --डॉ राहुल भडागे

दात काढल्यानंतर नवीन दात बसवणे खरंच आवश्यक आहे का...? 
अनेक वेळा जेव्हा दात दुखीमुळे पेशंट येतात आणि तपासणी नंतर लक्षात येते की दात हा पूर्णपणे खराब झालेला आहे , त्याला काढण्याची आवश्यकता आहे त्यावेळेस दात काढल्याशिवाय काहीही पर्याय नसतो.


दात काढल्यानंतर खराब दातामुळे असलेल्या वेदना कमी होतात आणि पेशंटला बरे वाटते. पण त्याठिकाणी नवीन दात बसवले नाही गेले तर त्याचा इतर दातांवर आणि हिरड्यांवर ही वाईट परिणाम होतो.
अक्कलदाढ सोडली तर प्रत्येक काढलेल्या किंवा गमावलेल्या दाताच्या ठिकाणी नवीन दात बसवण्याची आवश्यकता असते. अक्कल दाढ काढल्यानंतर त्याठिकाणी नवीन दात बसवण्याची आवश्यकता नसते.
अगदी निरोगी अवस्थेत सुद्धा दात काही प्रमाणात हालचाल करू शकतात. ही हालचल सतत होत असते. सर्व दातांना रिकाम्या जागा भरण्याची सवय असते. जिथे रिकामी जागा असेल त्या ठिकाणी आजूबाजूचे दात अतिक्रमण करायला लागतात.
दात काढल्यानंतर त्या ठिकाणी नवीन बसवला गेला नाही तर आजूबाजूचे दात हळूहळू त्या रिकाम्या जागेत सरकायला लागतात. हे सरकणे वेडेवाकडे असते.

असे दात सरकल्यामुळे आजूबाजूच्या दातांमध्ये फटी निर्माण होतात , तिथे अन्न कण अडकून कीड लागण्याचे प्रमाण आणि हिरड्यांचे आजार वाढते.  चेहऱ्यात आणि बोलण्यात सुद्धा बदल होऊ लागतात.

तसेच ज्या ठिकाणी दात काढला असेल त्याच्या विरुद्ध बाजूला असलेला दात ती जागा व्यापायला सुरुवात करतो. म्हणजे जर खालची पहिली दाढ काढली असेल तर वरची पहिली दाढ खालच्या  दाढीच्या जागेमध्ये अतिक्रमण करायला लागते. यालाच Supra Eruption असे म्हणतात.

Satpur dentist, Satpur dental clinic, दातांचा दवाखाना
नवीन दात ना बसवल्यामुळे वेडेवाकडे होणारे दात

आता असा विचार करा की एकापेक्षा जास्त दात जर तोंडामध्ये नसतील तर बाकीच्या दातांची काय परिस्थिती होत असेल . संपूर्ण दातांची ठेवण बिघडून जाते. वरचे आणि खालचे दात एकमेकांना व्यवस्थित लागत नाही आणि त्यामुळे खाण्याची क्षमता कमी होते. हिरड्यांचे आजार वाढून जातात आणि दात हळूहळू करून हलायला लागतात.
दात वेडेवाकडे झाल्यामुळे जेवताना नीट अन्न चावता येत नाही. चावण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे अनेकदा अशा रुग्णांमध्ये पोटाचे विकार असतात.
तर या लेखाचा सारांश असा की जर काही कारणामुळे आपल्याला दात काढावा लागला असेल किंवा पडला असेल तर तो आपल्या डेंटिस्ट च्या सल्ल्याने त्वरीत बसवून घेणे चांगले असते. नवीन दात बसवण्याच्या अनेक पद्धती आहेत . आपल्या डेंटिस्ट च्या सल्ल्याने नवीन दात बसवून आधी सारखं मौखिक आरोग्य सांभाळता येईल.

-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८

©Dr. Rahul Bhadage

Comments