Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात..

These 5 methods of replacing teeth can bring your smile back
दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं.
मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. 
लिंक
या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो.

दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट.
डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो.
नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात.
दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात.
२. फिक्स्ड ब्रिज

फिक्स्ड ब्रिज म्हणजेच आजूबाजूच्या दोन दातांच्या आधारे मध्ये बसवलेला नवीन दात.
ही पद्धत सर्वात लोकप्रिय आहे. यासाठी आजूबाजूचे दातांच्या आधार घेतो, आणि त्यासाठी आजूबाजूच्या दातांना काही प्रमाणात कमी करावं लागतं. नंतर माप घेऊन त्याठिकाणी ब्रिज बसवता येतो.
फिक्स्ड ब्रिज साठी कुठल्या ही प्रकारची शस्त्रक्रिया करावी लागत नाही. तसेच काही त्रास सुद्धा होत नाही.
या प्रकारचे दात अत्यंत नैसर्गिक दिसतात आणि खऱ्या दातांसारखे काम करतात.
योग्य प्रकारे काळजी घेतल्यास हे दात वर्षानुवर्षे चालतात.
३. रेसिन रिटेंड ब्रिज

या प्रकारच्या ब्रिजमध्ये शेजारच्या दातांना फक्त मागील बाजू मध्ये कमी करून ब्रिज बसवण्यात येतो. या प्रकारचे दात फक्त समोरच्या बाजूला बसवण्यासाठी चांगले असतात कारण त्या दातांवर खाताना जोर येत नाही.
फिक्स्ड ब्रिज पेक्षा हे दात कमी चालतात आणि त्याच प्रमाणे हे फिक्स्ड ब्रिज पेक्षा स्वस्तही असतात.
४. काढणा घालण्याची आंशिक कवळी

आंशिक कवळी मध्ये एक किंवा त्याहून अधिक दात काढण्या घालण्याच्या पद्धतीने बसवता येऊ शकतात.
हे दात दिसायला बर्‍यापैकी नैसर्गिक दिसतात आणि त्यांनी जेवण चांगल्या पद्धतीने करता येते.
हे दात इंप्लांट आणि फिक्स्ड ब्रिज पेक्षा स्वस्त असतात आणि यांचा दुरुस्तीचा खर्चही कमी असतो.
या दातांमध्ये कवळीला रात्री काढून ठेवण्याची आवश्यकता असते.
५. संपूर्ण कवळी

सर्व दात पडल्यानंतर जर इम्प्लांट करायचं नसेल ( काही आजार असल्यामुळे किंवा आर्थिक परिस्थितीमुळे) तर संपूर्ण कवळी हाच एक पर्याय असतो. यासाठी पाच ते सात वेळेस आपल्या डेंटिस्टकडे जावे लागते. ही एक मोठी उपचार पद्धती आहे ज्यांनी वरचे आणि खालचे संपूर्ण दात बसवता येतात.
या दातांनी एकदा सवय झाल्यास व्यवस्थित खाता येते आणि तसेच दिसायलाही ते उत्तम दिसतात.
या प्रकारच्या दातांना रात्री काढून ठेवण्याची आवश्यकता असते.
याचा खर्चही इम्प्लांट  पेक्षा बराच कमी असतो.
योग्य प्रकारे निगा राखल्यास हे कमीत कमी चार ते पाच वर्ष वापरता येतात.
आपल्या साठी कोणता पर्याय उत्तम आहे हे तपासल्यानंतर समजू शकते, त्यासाठी आपल्या डेंटिस्टचा सल्ला घ्यावा.
वरील पाचही उपचार पद्धती चांगल्या आहेत.
प्रत्येकाचे आपले फायदे व तोटे आहेत, तरी आपल्यासाठी कुठले दात योग्य आहेत हे आपल्या डेंटीस्ट सोबत चर्चा करून ठरवावे.
-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr. Rahul Bhadage

Comments