Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

पुढे आलेले दात मागे घ्यायला आणि सरळ करायला किती वेळ लागतो?

पुढे आलेले दात मागे घ्यायला आणि सरळ करायला किती वेळ लागतो? -  डॉ राहुल भडागे

ब्रेसेसचे उपचार घ्यायला आलेले प्रत्येक व्यक्ती हा प्रश्न सुरुवातीला नेहमी विचारतो की दात सरळ करायला आणि मागे घ्यायला नेमका किती वेळ लागेल.
प्रत्येकाला हे जाणून घ्यायची इच्छा असते की त्यांचे ट्रिटमेंट कधी संपेल, ब्रेसेस कधी निघतील आणि दात लवकरात लवकर सरळ आणि व्यवस्थित कधी होतील .

तर याचे उत्तर म्हणजे संपूर्ण उपचार करायला साधारणपणे 6 महिने ते 24 महिने एवढा कालावधी लागतो.
काही लोकांचे ट्रीटमेंट 12 महिन्यातही संपू शकते, आणि काही लोकांना 3 वर्षापर्यंत ही लागू शकतात.

दात सरळ करण्याचे प्रक्रिया हे प्रत्येक व्यक्तीसाठी सारखी नसते. प्रत्येक व्यक्तीचे दात आणि दातांची ठेवण वेगळी असते. यामुळे ट्रीटमेंट ला नेमका किती वेळ लागेल हे आपण तपासणी केल्याशिवाय सांगू शकत नाही. तसेच प्रत्येक व्यक्तीसाठी उपचाराची पद्धत आणि कालावधी वेगवेगळी असते.

तरीही काही गोष्टी असतात यामुळे ट्रीटमेंट उपचाराची कालावधी कमी किंवा जास्त होत असते त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात.

1. उपचाराची पद्धत

ब्रेसेसच्या उपचारासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहे. त्यामध्ये
मेटलचे ब्रेसेस (Metal braces ),
सेरमिक ब्रेसेस (Ceramic braces) आणि क्लियर अलायनर ( Clear Aligners) असतात.
मेटलचे ब्रेसेस हे मजबूत असतात. सेरमिक ब्रेसेस आणि क्लियर अलायनर हे मेटलचे ब्रेसेस पेक्षा दिसायला चांगले असतात. उपचाराची वेळ मेटल आणि सेरमिक ब्रेसेस मध्ये थोड्याफार प्रमाणात सारखेच असते.

2. वय

लहान मुलांमध्ये प्रौढ व्यक्तींपेक्षा उपचार लवकर होत असतात. लहान मुलं आणि तरुणांमध्ये जबड्याची वाढ चालू असते आणि हाड नरम असतं, त्यामुळे उपचार लवकर होतात आणि दात जबड्यामध्ये हव्या त्या ठिकाणी योग्य पद्धतीने लवकर हलवता येतात.
पण याचा अर्थ हा होत नाही की प्रत्येक प्रौढ व्यक्तीला ब्रेसेस दोन वर्षापर्यंत ठेवावे लागतात. प्रौढ व्यक्तींमध्ये सुद्धा उपचार काही वेळा सहा महिने ते एका वर्षात संपू शकते.

3. दात किती वेडे वाकडे आणि पुढे आहे

उपचारासाठी नेमका किती वेळ लागेल याचं नेमकं उत्तर म्हणजे आपली केस किती अवघड आहे. फक्त काही दात वेडेवाकडे असले किंवा फटी असल्यास उपचार लवकर होत असतात.
जास्त दात वेडेवाकडे असल्यास किंवा काही दात काढण्याची गरज असल्यास उपचाराची कालावधी वाढते.

4.  रुग्णांचे सहकार्य आणि दिलेल्या सूचना पाळणे

ब्रेसेसच्या उपचारांमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे सर्वात महत्त्वाचा आहे. वेळोवेळी आपल्या डेंटिस्ट कडूूून सांगण्यात आलेल्या सूचना योग्य पद्धतीने पालन केल्यास उपचाराचा कालावधी कमी होतो.
तसेच दात स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.या उपचारांमध्ये महिन्यातून एकदा येण्याची आवश्यकता असते, तर दिलेल्या अपॉइंटमेंट च्या वेळेला आल्यास उपचार योग्य पद्धतीने चालू राहते.

शेवटचे काही शब्द

ब्रेसेस चा उपचाराला नेमकं आपल्याला किती वेळ लागणार आहे हे फक्त तपासणीअंती सांगण्यात येऊ शकतं. यासाठी काही फोटो तसेच जबड्याचे काही  X-RAY ची गरज असते. त्यावरून आपले उपचार ठरवण्यात येते आणि नेमकी कालावधी सांगता येऊ शकते.

काही उदाहरणं -

१. खालील केस मध्ये १७ वर्षीय मुलाला फक्त पुढचा एक दात सरळ करण्याची आवश्यकता होती. तर हे उद्दिष्ट आपल्याला फक्त चार महिन्यांमध्ये पूर्ण करता आलं.


२. या केसमध्ये 27 वर्षीय तरुणाचे फक्त पुढचे दात सरळ करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला.


आपल्याला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात.
तसेच आपल्याला तपासणी करून या ट्रीटमेंटसाठी नेमके वेळ लागेल हे जाणून घ्यायचं असेल, तर अपॉइंटमेंट साठी खालील क्रमांकांवर संपर्क करावा.

-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr. Rahul Bhadage

Comments

Post a Comment

आणखी माहिती साठी, आपले प्रश्न किवा संदेश कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा.

Popular Posts