Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

काही लोकांच्या दातांमधून रक्त का येतं? डॉ राहुल भडागे

माझ्या हिरडीतून रक्त का येत आहे ?

बर्याच लोकांना जेव्हा मी विचारतो की तुम्ही किती वेळेस ब्रश करतात तेव्हा ते विचार करायला लागतात. बरेच पेशंट फक्त दवाखान्यात यायच्या काही दिवसाआधीपासून दोनदा ब्रश करायला लागतात. आणि ट्रीटमेंट संपल्यानंतर पुन्हा एकच वेळ ब्रश करतात.
अनेक लोक फक्त एकदाच ब्रश करतात तेही फक्त सकाळी. आणि एके दिवशी त्यांच्या लक्षात येतं की आपल्या टूथब्रश वर थोडे रक्त आलेलं आहे तर मग प्रश्न असा आहे की हिरडीतून रक्त का येतं.

हिरडीतून रक्त येण्याचे बरेच कारणं आहेत.

सगळ्यात पहिलं कारण आहे हिरडीचा आजार, ज्याला Gingivitis म्हणतात.  दातावर मऊ अशी घाण जमा होते आणि काही ब्रश केल्यानंतर ही पूर्ण पणे निघत नाही .
ती घाण  हिरडीत इन्फेक्शन तयार करून gingivitis सुरु करते.
हीच मऊ घाण नंतर कडक होते ज्याला कॅल्क्युलस असे म्हणतात.
Daat, hirdi, rakt, nashik , Satpur, bleeding gums

हे कॅल्क्युलस हिरडीला काट्यासारखे टोचतात आणि त्यामुळे अजून जास्त रक्त येतं.  सुरुवातीला हिरडीला थोडी सूज येते आणि काही काळानंतर ब्रश केल्यानंतर रक्त यायला सुरुवात होते . जास्त दिवस हे सुरू राहिल्यास हिरडीला व दाताला धरणाऱ्या हाडाला इजा होते व त्यामुळे दात हलायला लागतात. हे कॅल्क्युलस खालच्या पुढील दातांमध्ये जास्त जमा होते आणि बऱ्याचदा यामुळे दात लवकर हलायला लागून ते स्वतःहून पडण्याची शक्यता वाढून जाते.

याच वेळी खरंतर डेंटिस्ट कडे जाऊन चेक करण्याची आवश्यकता असते
रक्त पातळ करण्याचे औषधांमुळे हिरडीतून रक्त येऊ शकते

अतिशय कडक असा टूथब्रश वापरल्यामुळे हिरड्यांना इजा होते आणि रक्त सुरू होते.  यासाठी नेहमी मऊ केसांचा टूथब्रश वापरायला हवा आणि तोही दर दोन-तीन महिन्यानंतर बदलला पाहिजे.

काहीवेळा गरोदर महिलांच्या हिरडीतून रक्त येणे सामान्य असतं, जे हार्मोन्सच्या बदलामुळे होत असते.
कारण काहीही असो हिरडीमधून रक्त येणं ही गंभीर समस्या आहे आणि ज्याला लवकरात लवकर बरं करायला हवे.
आपल्या दंत वैद्याला दाखवून नेमकं कारण शोधून त्यावर उपचार करणे केव्हाही चांगले.

डॉ. राहुल भडागे
दंतरोग तज्ज्ञ
डॉ आंबेडकर मार्केट,
तुळसाई हॉस्पिटल समोर,
सातपूर कॉलनी ,
सातपूर, नाशिक
मो. : ९८६०८८४६४८

Comments