Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

काही खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करणं दातासाठी अपायकारक

काही खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करणं दातासाठी अपायकारक.. -- डॉ राहुल भडागे



तुम्हाला हे वाचून कदाचित आश्चर्य वाटेल पण जेवणानंतर लगेच ब्रश करणे आपल्या दातांसाठी हानीकारक ठरु शकते. काहीही खाल्ल्यानंतर ब्रश करण्यासाठी कमीत कमी एक तास तरी थांबायला हवे.

याचे कारण काय?

दातावरचे कडक आवरण ज्याला ENAMEL असं म्हणतात शरीरातलं सर्वात टणक पदार्थ असतो. पण जेवण झाल्यानंतर जे ऍसिड तयार होते ते दाताची झिज करते. जेवण झाल्यानंतर तोंडामध्ये आम्ल तयार करण्याची क्षमता वाढलेली असते जे तुमच्या दाताला कमकुवत करू शकते.
हे तोंडातले वाढलेले आम्ल, अर्धा ते एक तासानंतर पुन्हा पूर्ववत होतात. 

दातांवर जमा असलेल्या अन्नकण लाळीमुळे नैसर्गिक रित्या स्वच्छ होतात आणि  तोंडातील pH ला पूर्ववत आणण्यास मदत करतात.
जेवल्यानंतर लगेच ब्रश केल्यामुळे आपण खरं तर दातांना इजा पोहोचवत असतो . 
जरी आपण मऊ  केसांचा टूथब्रश वापरला तरीही जास्त आम्ल तयार झाल्यामुळे दाताच्या  enamel ला घर्षण होऊन ,झीज होते. 


जेवण केल्यानंतर पाण्याने फक्त चूळ भरणे पुरेसे असते, ज्यामुळे अन्नकण निघून जातात व दात स्वच्छ होतात.

मग ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

जेवण झाल्यानंतर रात्री एक तासांनी ब्रश करणे कधीही चांगले.
म्हणजेच दिवसातून दोनदा ब्रश करणे गरजेचे आहे.


-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr.RahulBhadage

Comments