Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

आपल्या मुलाची दंतवैद्याकडे पहिली भेट-- डॉ राहुल भडागे

आपल्या मुलाची दंतवैद्याकडे पहिली भेट
-- डॉ राहुल भडागे
माझ्या दवाखान्यात हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न, आणि याचे उत्तर तुम्हाला कदाचित आश्चर्यचकित करू शकते.
पालक नेहमी विचारतात की आपल्या पाल्याला दवाखान्यात नेण्यासाठी योग्य वय काय आहे. काही पालकांना वाटतं की जोपर्यंत सर्व दुधाचे दात येत नाही तोपर्यंत दात तपासायची काही आवश्यकता नाही आणि काही पालकांना तर अस ही वाटते की जोपर्यंत सर्व दात पडून नवीन दात येत नाही तोपर्यंत तपासण्याची आवश्यकता नाही.


इंडियन डेंटल असोसिएशन नुसार बाळाचं पहिलं दात आल्यानंतर किंवा वयाच्या एक वर्षाच्या आधी वैद्याकडे तपासणे गरजेचे आहे.
पालक विचारात पडतात की संपूर्ण दात आलेले नाही तर तपासणी सारखे काय आहे.खरंतर तोंडातले इतरही बरेच अनुवंशिक तसेच संक्रमण होणारे आजार असतात. ते लवकर लक्षात आल्यास त्याचे लवकर निदान करू शकतो. तीन वर्षाच्या आतील मुलांना फक्त या आजारांसाठी तपासतो.  ह्यामध्ये कधीही स्वच्छता किंवा एक्स-रे काढत नाही जोपर्यंत दातांवर खूप घाण किंवा किडलेले दात नसतील .

सर्वात महत्त्वाचं असतं ते मुलांच्या खानपाना विषयी सल्ला, ज्याला diet counseling ही म्हणतात. मुलांचे दात किडायला खूप लवकर सुरुवात होते. व्यवस्थित काळजी घेतल्यास दात किडणे टाळता येऊ शकते, ज्यामुळे नंतर उपचाराची गरज पडत नाही.
खालील लेखात लहान मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन केलं आहे.


कमी वयात दंतवैद्याकडे दाखवल्यास मुलांमध्ये असणारी दवाखान्याची भीती ही कमी होते.
आपले काही प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे.


-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr.RahulBhadage

Comments