Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

लहान मुलांचे दातांची काळजी - Lahaan mulanche Daatanchi kalji.

लहान मुलांचे दातांची काळजी.
Lahaan mulanche Daatanchi kalji.

आपण सर्वांना दातांची काळजी घेण्याबद्दल माहिती असते. पण लहान मुलांच्या दातांची काळजी घेणे हे तेवढेच
महत्वाचे आहे. लहान मुलांचे दुधाचे दातांची काळजी घेण्यासाठी काही महत्वाचे उपाय.


१) जन्मापासून काळजी घेणे :-
तोंडात दात दिसत नसले तरीही हिरडीची काळजी घ्यायला हवी. दात ४-६ महिन्यांत यायला लागतात. त्या आधी ओल्या स्वच्छ
कपड्याने किंवा पट्टीने हिरडी स्वच्छ करावी.
२) लहान मुलांचे ब्रश :-
दोन वर्षा नंतर जेव्हा सर्व दात येतात, तेव्हा पासूनच ब्रश बापरायला पाहिजे. थोड्या प्रमाणात टुथपेस्ट घेऊन आईवडिलांनी
आपल्या हाताने मुलांचे दात स्वच्छ करायला पाहिजे.
३) दोन टुथब्रशचा बापर :-
दोन वर्षाचे झाल्यानंतर बर्‍याच मुलांना स्वत: ब्रश करायचे असते पण ते टुथब्रशला फक्त चावतात. अशा वेळी एक टूथब्रश
त्यांच्या हातात पकडवून दुसऱ्या टुथब्रशने दात स्वच्छ करावे. या वयाच मुलांना गुळणी करता येते, तर त्यांना टूथपेस्ट थुंकायला
सांगणे.
४) नवीन चवीचे टुथपेस्ट वापरावे ;-
काही मुलांना चवीबद्दल आवड निवड असते. सध्या बाजारात अनेक प्रकारचे, चवीचे टुथपेस्ट उपलब्ध आहेत. आपल्या मुलांच्या
आवडीनुसार पेस्ट वापरावे.
७) ब्रश करतांना लक्ष देणे :-
मुलांना ब्रश करतांना एकटे सोडू नये, ते कशा प्रकारे ब्रश करतात हे बघुन त्यांना शिकवायला पाहिजे. गरज पडल्यास आपल्या
दंतरोग तज्ञांना भेटून योग्य पध्दत शिकवायला हवी. वयाच्या ६-८ वर्षा पर्यंत मुलांना ब्रश करतांना लक्ष द्यायला हवे.
६) दोनदा ब्रश करण्याची सवय असणे :-
सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्यास बरेच दातांचे त्रात व आजार कमी होतात. लहानपणीच ही सवय
लावल्यास भविष्यात खुप फायदा होतो.

७) रात्री बॉटल्सने दुघ देणे टाळणे :-
गोड व चिकट पदार्य जास्त खाण्यामुळे मुलांचे दात खुपच कमी वयात खराब होतात, फक्त मुलांना रागावून होत नाही. त्यासाठी
झ लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे,  किती गोड पदार्य खात आहे, त्यापेक्षा किती वेळा खात आहे हे महत्वाचे, मुलांना जेवतांना गोड पदार्थ जसे चॉकलेट
किंवा चिप्स दिल्यास दातांना कमी त्रास होतो.
८) दंतरोग तज्ञांकडून नियमित तपासणी :-
मुलाच्या पहिल्या वाढदिवसापासून दंत रोग तज्ञांकडून दात तपासून घ्यायला हवे. दुधाचे दात हे भविष्यात येणाऱ्या नवीन दातांचे
आधार आहे. त्यांची योग्य पध्दतीने काळजी घेतल्यास मुलांच्या दातांची वाढ योग्य प्रमाणात होते आणि आपल्या जेवणाचा
आयुष्यभर आनंद घेता येतो.
डॉ. राहुल भडागे
दंतरोग तज्ज्ञ
डॉ आंबेडकर मार्केट,
तुळसााई हॉस्पिटल समोर,
सातपूर कॉलनी ,
सातपूर, नाशिक
मो. : ९८६०८८४६४८

Comments