Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

लहान मुलांचे दात किडू नये म्हणून काय कराल ??

लहान मुलांचे दात किडू नये म्हणून काय कराल ??

बाळ १ वर्षांचं झाल्यावर दंतचिकित्सकाकडे जाऊन मार्गदर्शन घ्या
बाळ जन्मल्यानंतर ६ महिन्यांपासून बाळाला दात देतात.
बाळाला सर्वप्रथम खालचे २ दात येतात.
बाळ २ वर्षांचे होईपर्यंत त्याला हळूहळू २० दात येतात
० - ३ वयोगटातील मुलांनी फक्त ब्रश आणि पाण्याने दात घासावे
३ - ६ वयोगटातील मुलांसाठी फ्लोराईडच्या वेगळ्या टूथपेस्ट असतात
डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या वाचाव्या.

दात किडल्यानंतर काय कराल ?

लहान मुलांच्या पक्क्या खोलगट दातांना अनेकदा किड लागते. अशावेळेस हा दात काढायचा नसेल तर त्यात सीलंट नावाचं सिमेंट भरलं जातं. तसंच त्यांचं रुट कॅनल करायचं झाल्यास त्या दाताच्या नसेच्या जागी अॅंटिबॉयोटिक औषध लावलं जातं. मोठ्यांचं जेव्हा रुट कॅनल केलं जातं, तेव्हा त्यांची दुखणारी नस कापून त्या जागी आर्टिफिशिअल नस बसवली जाते.
लहान मुलांना माऊथ वॉश द्यायला पाहिजे का ?
लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा माऊथ वॉश दिला जात नाही. कारण काय गिळावं आणि काय गिळू नये, हे त्यांना बऱ्याचदा कळत नाही.
बाळ आईच्या दुधावर असताना काय काळजी घ्यायला पाहिजे?
माता बाळाला स्तनपान करत असेल तर स्तनपानानंतर बाळाचे दात स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. जेणेकरुन दातांवर प्लार्क साचायची भीती राहत नाही.
खरंतर दात वाचवण्यासाठी आईने सुरुवातीपासूनच काळजी घेतली पाहिजे. कारण, दूधाचे दात किडल्यानंतर एकतर फिलींग करावं लागतं किंवा त्यावर रुट कॅनल करावं लागतं. शेवटी जर ती किड नसेला त्रास देत असेल तर तो दात काढावा लागतो. त्यातही आम्ही जो पक्का दात येणार आहे, त्यासाठी स्पेस मेनंटर लावून ठेवतो. म्हणजे येणारा पक्का दात वाकडातिकडा येत नाही.
मुलांचे दात वाचवण्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्या आईवडिलांनी काळजी घ्यायला हवी, व योग्यवेळी योग्य मार्गद्शनाने आपल्या मुलांचे दात किडणे पासून वाचवता येऊ शकत.

डॉ. राहुल भडागे
दंतरोग तज्ज्ञ
डॉ आंबेडकर मार्केट,
तुळसााई हॉस्पिटल समोर,
सातपूर कॉलनी ,
सातपूर, नाशिक
मो. : ९८६०८८४६४८

Comments