Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

ब्रेसेस वा क्लिप्स ट्रीटमेंट बद्दल काही नेहमी विचारले जाणारे ७ प्रश्न -- डॉ राहुल भडागे

ब्रेसेस वा क्लिप्स ट्रीटमेंट ची आवश्यकता का असते?

सहसा चेहर्‍याचा आकार सुधारण्यासाठी आपण ब्रेसेस ची ट्रीटमेंट चा सल्ला देतो. या ट्रीटमेंट मुळे वेडे वाकडे असलेले दात , पुढे मागे असलेले दात सरळ करून त्यांना व्यवस्थित आकार देता येतो. जर ही ट्रीटमेंट नाही केली तर दात किडण्याचे प्रमाण तसेच हिरड्यांच्या आजाराचे प्रमाण वाढते. यामुळे काही वेळेस नीट जेवण करायलाही त्रास होतो.

ब्रेसेस चे ट्रीटमेंट केव्हा करावी?

सध्याच्या नवीन तंत्रज्ञानामुळे ब्रेसेस व क्लिप्स ची ट्रीटमेंट कुठल्याही वयोगटात करता येऊ शकते. तरीही दहा ते चौदा हे वयोगट आदर्श मानले जाते. जेव्हा तोंड व जबड्याची वाढ होत असते आणि दात सरळ करणे किंवा मागे घेणे लवकर शक्य होते.
तसेही ब्रेसेस आणि क्लिप्स ची ट्रीटमेंट आता फक्त लहान मुलांसाठीच नाहीये . डॉ भडागे श्री दातांचा दवाखाना व ऑर्थोडोंटिक सेंटर, सातपूर कॉलनी, नाशिक येथे
बरेच तरुण तरुणी व चाळीशी च्या पुढे असलेले लोकही ही ट्रीटमेंट घेऊन आपले हास्य सुंदर करतात.
http://bit.do/DrBhadage

ब्रेसेस किती प्रकारचे असतात?

सुरुवातीला चेक केल्यानंतर डेंटिस्ट काही एक्स-रे काढायला सांगतात. एक्स-रे वरून उपचारासाठी लागणारा कालावधी व खर्च सांगण्यात येतो. ब्रेसेसचे बरेच प्रकार असतात,जसे मेटल,सिरामिक किंवा प्लास्टिक , जे दातावर चिटकवता येतात. सिरॅमिकच्या ब्रेसेस दाताच्या रंगाचे असतात आणि लवकर लक्षात येत नाही.

ब्रेसेस क्लिप्स ची ट्रीटमेंट चा कालावधी किती असतो?

उपचाराचा कालावधी सर्वस्वी पेशंटच्या दातांच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. जसं वय वाढतं तसा उपचाराचा कालावधी बदलतो आणि जेवढे जास्त दात वेडेवाकडे किंवा पुढे मागे असेल, त्या प्रमाणे उपचाराचा कालावधी कमी-जास्त होतो.
तरी साधारणतः 12 ते 24 महिन्यांमध्ये ट्रीटमेंट संपते. ट्रीटमेंट संपल्यानंतर रिटेनर 6 ते 12 महिने वापरण्याची गरज असते ज्यामुळे दात आपल्याला हव्या त्या ठिकाणी टिकून राहतात.

ह्या ट्रीटमेंट मध्ये काही त्रास होतो का?

दर महिन्याला ब्रेसेस मध्ये असणारी वायर घट्ट केली जाते किंवा बदलली जाते. यावेळी सुरुवातीचे एक-दोन दिवस थोड्या वेदना जाणवू शकतात पण त्या वेदनाशामक ने थांबतात.

ट्रीटमेंट चालू असताना घरी काय काळजी घ्यावी?

ट्रीटमेंट मध्ये दात स्वच्छ ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे असते . ब्रेसेस मध्ये कधीही छोटे-छोटे अन्नाचे कण किंवा प्लाक अडकायला नको .
प्रत्येक वेळी जेवण झाल्यानंतर पाण्याने गुळण्या कराव्यात . तसेच फ्लोराईड असलेली टूथपेस्ट आणि मऊ टूथब्रश ने दोन वेळेस ब्रश करावे.
ह्या ट्रीटमेंट मध्ये दात काढायची गरज असतेच का?
प्रत्येकाची दातांची ठेवणं वेगळी असते. प्रत्येक केस मध्ये दात काढवेच लागतात असे नाही. दातांमध्ये फटी असल्यास किंवा दात थोडेच पुढे असल्यास दात नाही काढावे लागत. खूप पुढे असलेले व जास्त वेडे वाकडे दात असले तर काही वेळेला उपदाढा काढयची गरज असू शकते.   ते निर्णय सर्वस्वी आपले डेंटिस्ट एक्स रे वरून आणि आपल्या मापावरून ठरवतात.

सातपूर नाशिक मध्ये ही ट्रीटमेंट कुठे घेता येते?


डॉ भडागे श्री दातांचा दवाखाना व ऑर्थोडोंटिक सेंटर, सातपूर कॉलनी, नाशिक येथे
हे ट्रीटमेंट खात्रीशीर रीतीने घेता येऊ शकते.


-- डॉ राहुल भडागे

९८६०८८४६४८
©Dr.RahulBhadage

Comments