Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

तोंड येण्याची म्हणजेच ULCER होण्याची कारणे आणि उपचार



तोंड येण्याची म्हणजेच ULCER होण्याची कारणे आणि उपचार - -- डॉ राहुल भडागे
तोंड येणे म्हणजेच अल्सर, ही लहान वेदनादायी जखम असते, जी तोंडामध्ये किंवा हिरडीच्या जवळ दिसते.  यामुळे खाणं-पिणं आणि बोलणंही वेदनादायी होत असतं.
कुठल्याही वयोगटात तोंड येऊ शकते. तरीही महिलांनामध्ये व लहान मुलांमध्ये तोंड येण्याचे प्रमाण जास्त असते.
तोंडातील अल्सरमुळे साधारणतः पंचवीस ते तीस टक्के लोकसंख्या प्रभावित असते . यामध्ये तोंडाच्या आतील म्युकस मेम्ब्रेन म्हणजेच तोंडाच्या आतील त्वचेला इजा झालेली असते. हे दोन ते तीन दिवस किंवा एका आठवड्यापर्यंत राहू शकते.
तोंड येण्याची लक्षणे
ओठांच्या आत, जिभेवर किंवा तोंडात गालाच्या आत फोडांसारखी जखम दिसू शकते. यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त अल्सर असणेही शक्य आहे. या अल्सरच्या भोवती लाल रंगाची सूज असते आणि आत मध्ये पिवळसरपणा असतो.
तोंड आल्यावर खाली लक्षणे दिसतात
* हलक्या लाल रंगाचे चट्टे,
* जेवताना व बोलताना वेदना,
* काही वेळा हे अल्सर जळत असल्याची संवेदना,
* जास्त प्रमाणात लाळ येणे,
* थंड पाणी किंवा अन्न घेतल्यास त्रास तात्पुरता कमी होतो.
* लहान मुलांच्या बाबतीत ते जास्त चिडचिड करतात.
तोंड येण्याची कारणे
* तोंडात काही जखम होणे,
* ब्रश करताना किंवा चुकून जेवताना चावल्यामुळे,
* काही आंबट पदार्थ जसे स्ट्रॉबेरी, पाईन एप्पल,
* अति प्रमाणात चहा किंवा कॉफीच्या सेवन केल्यामुळे,
* विटामिन बी १२, झिंक किंवा इतर पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे ही तोंड येऊ शकते.
* हार्मोन्सच्या बदलामुळे,
* झोपेची कमतरता,
* पोट स्वच्छ न होणे,
* काहीवेळा बॅक्टेरियल किंवा वायरल इन्फेक्शन मुळे ही तोंड येऊ शकते.
सामान्यतः तोंडाचे अल्सर काही दिवसात बरे होतात परंतु काही दिवसात बरे न झाल्यास किंवा खालीलपैकी एखादी गोष्टी आढळल्यास आपल्या डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे.
* अल्सरचा त्रास दोन ते तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकत असल्यास.
* अल्सर मोठे होत असल्यास.
* तोंड येण्यासोबात तापही येत असल्यास.
* अल्सर नवीन भागात पसरत असल्यास.
* तोंड आलेल्या ठिकाणी रक्तस्राव
* बाहेरच्या त्वचेवर फोडी किंवा गिळताना त्रास होत असल्यास.
तोंड येण्यावर उपचार
बऱ्याच वेळी घरगुती किरकोळ उपचारांच्या मदतीने अल्सर बरा होऊ शकतो . तरीही काही वेळा डॉक्टर लगेच बरे होण्यासाठी काही औषध देऊ शकतात, त्यासाठी आपल्या डॉक्टरचा सल्ला घ्यावा
जळजळ व वेदना दूर करण्यासाठी अल्सरच्या जखमेवर लावण्यासाठी वेदनाशामक मलम लावू शकता.
काही दैनंदिन जीवनात काळजी घेतल्यास तोंडाचा अल्सर येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
* दात स्वच्छ करताना नेहमी मऊ ब्रश वापरावा आणि दिवसातून किमान दोन वेळेस दात स्वच्छ करावे.
* एंटीऑक्सीडेंट ने समृद्ध असलेले  आणि विटामिन ए सी आणि ई सारखे खाद्यपदार्थ खावे, जसे की आंबा पपई, गाजर ,लिंबू ,पेरू ,आवळा, बदाम.
* चावायला सोपे असतील असे मऊ पदार्थ खावे.
* नियमित दंतचिकित्सा घ्यावी.
* पाणी भरपूर प्यावे.
काय करू नये
* तोंड धुण्यासाठी प्रखर टूथपेस्ट किंवा द्रव्य वापरू नये.
* मसालेदार किंवा आम्लयुक्त खाद्य पदार्थ टाळावे.
* सोडा पिणे टाळावे.
* अल्सरला  वारंवार स्पर्श करू नये.
* धूम्रपान किंवा मद्यपान करणे टाळावे.
* खूप गरम पिणे टाळावे.
स्वस्थ जीवन शैली, पुरेशी झोप घेणे आणि संतुलित आहार तोंड येण्याचे प्रमाण कमी करू शकते.
-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr.RahulBhadage

Comments