Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

दात किडू नये म्हणून काय काळजी घ्यावी..?



दात किडू नये म्हणून काय काळजी घ्यावी..? -- डॉ राहुल भडागे

Precautions to prevent teeth decay

दात किडणे ही खरंतर आजच्या काळातील गंभीर समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात कमीत कमी एक तरी दात किडलेला असतो किंवा किडायला सुरुवात तरी झालेली असते.  दाता वर उपचार घेणं हे काही वेळा गरजेचे असतेच पण त्याहीपेक्षा अधिक गरजेचे असते वेळीच काळजी घेणे, ज्यामुळे दात किडायला सुरवात होऊ शकत नाही आणि पुढील त्रास , खर्च आणि वेळ  या तिन्ही गोष्टी आपण वाचवू शकतो.
दात किडू नये म्हणून काय काळजी घ्यावी याआधी दात का किडतात हे समजून घेतल्यास जास्त फायदेशीर ठरेल.

दात का किडतात..?

आता एकदा आपल्याला समजलं आहे की दात का किडतात तर आपल्याला दातांची कीड टाळण्यासाठी उपाययोजना करणं सोपं जातं.
मागील लेखामध्ये आपण समजलं की दात किडण्याचे मुख्य कारण दातावर अडकलेले आणि चिटकलेला अन्नपदार्थ असतात.
आपल्याला कीड टाळायचे असेल तर सर्वप्रथम आपल्याला दातावर काहीही अडकलेले नको, याची पुरेपूर काळजी घ्यायला हवी .त्यासाठी दोन वेळा ब्रश करणे गरजेचे आहे . त्यातही रात्री ब्रश करणं खूपच अत्यावश्यक आहे.
याचं कारण म्हणजे रात्रीच्या  वेळी लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी झालेले असते. लाळ दातांवर साचलेली घाण नैसर्गिक रित्या स्वच्छ करण्याचे काम करत असते.  अडकलेलं अन्न कण रात्रभर बॅक्टेरिया च्या संपर्कात येतात आणि दात खराब करतात . त्यासाठी रात्री ब्रश करणे चांगले.
तसेच काही खाल्ल्यानंतर गुळणा करावा, म्हणजे अडकलेले अन्न लगेच निघून जाते.
ब्रश करणं महत्त्वाच आहेच, पण आपल्याला खाण्यापिण्यावर ही लक्ष द्यायला हवे . गोड आणि चिकट पदार्थांचे अतिसेवन टाळावे. पौष्टिक आणि सकस आहार घ्यावा.
गोड पदार्थ, चॉकलेट, मिठाई, बेकरी प्रोडक्ट सतत खाणे टाळावे तसेच वारंवार चहा किंवा कॉफी आणि कोल्ड्रिंक पिणे हे टाळावे.
तंबाखू बिडी सिगरेट अशा व्यसनांपासून दूर राहावे.
कधीही दात कोरण्यासाठी काड्यांचा किंवा टाचण पिनांचा वापर करू नये. गरज असल्यास डेंटल फ्लॉस चा वापर करावा.
वेडेवाकडे दात असल्यामुळे दातांमध्ये अन्नकण अडकून राहतात आणि कीड लागण्याचा प्रमाण वाढतं. अशावेळेस दात सरळ करण्याचे ट्रीटमेंट करून आपण कीड लागण्याचे प्रमाण कमी करू शकतो.
कृत्रिम दात बसवलेले असतील तर त्याची योग्य काळजी घ्यावी. व्यवस्थित दोन वेळा ब्रश करून त्यांना स्वच्छ ठेवावे.
आणि महत्त्वाचे म्हणजे दर सहा महिन्यातून एकदा आपल्या दंतवैद्याकडून दातांची तपासणी करून घ्यावी त्यामुळे आपले दात चांगले राहण्यास मदत होते.


-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr.RahulBhadage

Comments