Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

ह्या ५ गोष्टी तुमचे दात खराब करू शकतात...-- डॉ राहुल भडागे

ह्या ५ गोष्टी तुमचे दात खराब करू शकतात...
Ya paanch gosti tumche daat kharab karu shaktat



स्वस्थ व निरोगी दात असणे हे प्रत्येकालाच वाटते. जरी काही लोकांमध्ये दात किडण्याचे प्रमाण जास्त असले , तरी काही साध्या वाटणाऱ्या गोष्टी करून तुम्ही आपले दात स्वस्थ ठेवू शकतात. जसं की नियमितपणे दोन वेळा ब्रश करणे आणि दर सहा महिन्याला आपले दात दंतवैद्याकडून तपासून घेणे. काही गोष्टी तुम्ही स्वतः लक्ष देऊन काळजी घेतली तर आपले दात खराब होणे टाळता येते.

१.वारंवार काही चावणे..
दातांचे मुख्यतः काम खाणे आणि चावणे हे असते , एखादी प्लास्टिकची बॉटल उघडण्यासाठी किंवा नख कापण्यासाठी नव्हे. बरेचदा नख चावल्यामुळे हिरडीला आणि दाताला त्रास होतो. असं केल्यामुळे दाताचा काही भाग तुटू शकतो आणि हिरडीला इजा होऊ शकते.
शीतपेय मधील बर्फ सुद्धा काही लोक चावतात. बर्फ खूपच कडक असतो आणि तो दाताच्या enamel ला हानी पोचवून दाताला तडा देऊ शकतो.
काही व्यावसायिकांच्या कामामध्ये (जसं शिंपी आणि सुतार) टाचण पिन किंवा बारीक खिळे दातांमध्ये अडकून काम करण्याची सवय असते त्यामुळेही दातांची झीज होते.
अधिक वाचा -

२.अति प्रमाणात चहा, कॉफीचे आणि शीतपेयाचे सेवन...
चहा व कॉफी मध्ये असणारी साखर दाताला किडायला कारणीभूत ठरते . चहा आणि कॉफी पिल्या नंतर साध्या पाण्याने गुळण्या केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
शीतपेय आम्ल असल्यामुळे दातांची झीज वाढवतात आणि कालांतराने दात ठणकायला कारणीभूत ठरतात.

३.आम्ल पदार्थ आणि चिकट अन्नपदार्थ...
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चॉकलेट आणि साखर दातासाठी अपायकारक आहे. त्याचप्रमाणे आम्ल पदार्थ ज्यामध्ये आम्लाचे प्रमाण अतिशय जास्त असतं तेही दाताला खराब करतात. चिकट असलेले अन्नपदार्थ दाताला चिटकून राहतात आणि दाता मध्ये पोकळी करतात.


४.जोरात ब्रश करणे..
ब्रश करणे दातासाठी अत्यावश्यक आहे ,पण तरी जोरात ब्रश केल्यामुळे त्यांची झीज होते , तसेच हिरडीला इजा होते. योग्य पद्धतीने मऊ केसांच्या  टूथब्रश ने दात स्वच्छ केल्यास दातांचे आयुष्य वाढते. तसेच दर तीन महिन्याने टूथब्रश बदलावे. सर्दी खोकला ताप तसेच इतर आजार झाल्यानंतरही ब्रश बदलणे केव्हाही चांगले.
त्याचप्रमाणे काही खाल्ल्यानंतर लगेच ब्रश केल्यामुळे सुद्धा दातांना त्रास होतो आणि दातांचे इनॅमल खराब होते . हे टाळण्यासाठी काहीही खाल्ल्यानंतर  किमान ३० मिनिटानंतर ब्रश करावे.

५.दात कोरण्यासाठी काड्यांचा वापर..
काही लोकांना जेवण झाल्यानंतर दातांमध्ये अडकलेले अन्न काढण्यासाठी काडी किंवा टूथपिक वापरण्याची सवय असते . त्यामुळे तात्पुरते जरी बरे वाटत असले तरीही दाताला व हिरडीला इजा होते . त्याचप्रमाणे हाडाचीही झीज होते.
दातांमध्ये काड्यांचा वापर करण्यापेक्षा आपल्या दंतवैद्याला दाखवून त्याचा कायमस्वरूपी असा उपचार करून घेणे चांगले.
वरील सर्व वाईट सवयी सोडल्यास दात स्वस्थ , बळकट व निरोगी ठेवण्यास नक्की मदत होईल.
आणखी काही शंका प्रश्न असल्यास खालील कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे.

-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr.RahulBhadage

Comments