Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

दात का किडतात..?

दात का किडतात..?

जवळजवळ रोजच हा प्रश्न प्रत्येक येणाऱ्या रुग्णांकडून विचारण्यात येत असतो.

दातांची कीड, दाताच वेदना
दात किडायची सुरुवात

खरंतर दातांची नीट काळजी नाही घेतल्यामुळे आणि दोन वेळेस व्यवस्थित दात स्वच्छ न केल्यामुळे दात किडण्याचे प्रमाण वाढत आहे. वेळी-अवेळी खाण्यामुळे सुद्धा दातांवर गोड व चिकट पदार्थ साचून राहतात आणि त्यामुळे दात किडतात.

हेच गोड व चिकट अन्नपदार्थ तोंडातील बॅक्टेरिया च्या संपर्कात येऊन लॅक्‍टिक अॅसिड नावाचं आम्ल तयार करतात. या लॅक्‍टिक अॅसिड मुळे दातांचा वरचा थर, 'एनामल', ची झीज होऊ लागते. दाताला बारीक छिद्रे पडतात. याच छिद्रांमध्ये पुन्हा अन्नकण अडकते आणि लॅक्‍टिक अॅसिड तयार होण्याचे प्रमाण वाढते. हे सूक्ष्म छिद्रे मग खड्ड्यांमध्ये रूपांतरित होतात.

सुरुवातीला ही कीड वरच्यावर असते, त्यामुळे दाताला काहीही त्रास होत नाही. परंतु हीच कीड आतल्या थरापर्यंत गेल्यावर सुरुवातीला थंड-गरम चा त्रास व्हायला लागतो आणि नंतर दात ठणकायला लागतो. काही वेळा दाताला सूजही येऊ शकते.
ही कीड लागण्याचे प्रमाण रात्रीच्यावेळी जास्त असते कारण रात्री झोपल्यानंतर लाळ तयार होण्याची आणि गिळण्याची प्रक्रिया कमी होते.

म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दाताला कीड लागण्याचा मुख्य कारण दातावर चिटकलेल्या अन्नकण असतात , त्यामुळे कीड वाढते . तर हे थांबवण्यासाठी आपल्याला गरजेचे आहे कि हे अन्नकण दातावर चिटकून राहू नये म्हणजेच लॅक्‍टिक ऍसिड तयार होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे दाताला छिद्र आणि खड्डे पडत नाही.
पुढील लेखांमध्ये दात किडायला नको म्हणून काय काळजी घ्यायला हवी याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.


-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr.RahulBhadage

Comments

  1. Wonderful illustrated information. I thank you about that. No doubt it will be very useful for my future projects. Would like to see some other posts on the same subject!
    Best Braces Specialist in nashik

    ReplyDelete
  2. I am really impressed with your blog article, such great & useful knowledge you mentioned here.
    Your post is very informative. I have read all your posts and all are very informative. Thanks for sharing and keep it up like this.

    orthodontic braces and aligners in nashik

    ReplyDelete

Post a Comment

आणखी माहिती साठी, आपले प्रश्न किवा संदेश कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा.