Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

दात स्वच्छ करणे (स्केलिंग) म्हणजे नेमके काय..? - डॉ राहुल भडागे

दात स्वच्छ करणे (स्केलिंग) म्हणजे नेमके काय..?


दंत व मौखिक आरोग्य हे स्वस्थ शरीरासाठी महत्त्वाचे असतात. तुमचे वय काहीही असो , स्वस्थ दात असणे गरजेचे आहे . योग्य प्रकारे दातांची काळजी घेतल्यास आपले दात स्वस्थव निरोगी राहू शकतात.

डेंटिस्ट कडून मशीन द्वारे दात स्वच्छ करणे म्हणजेच स्केलिंग (SCALING)  ही दात व हिरड्या स्वच्छ आणि सुदृढ ठेवण्यासाठी करण्यात येणारी उपचार पद्धती आहे.
यामध्ये दात व हिरड्या वर जमा झालेले प्लाक (plaque) , कॅल्क्युलस (calculas)  व डाग काढण्यात येतात.

जर ही घाण काढली नाही तर त्यामुळे दातामध्ये इन्फेक्शन होऊन हिरड्या कमकुवत होतात आणि पायरिया सारखे आजार होऊ शकतात, ज्यात दातही गमवावा लागू शकतो.
दात स्वच्छ करणे म्हणजेच स्केलिंग  हा एक अत्यंत सुरक्षित आणि नेहमी करण्यात येणारा उपचार आहे . यामध्ये दाताच्या कुठल्याही भागाला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. फक्त हे योग्य पद्धतीने दंतवैद्याकडून करून घ्यावे लागते.


डेंटल प्लाक म्हणजे काय?

दातांवर जमा असणारे चिकट आणि रंगहीन पदार्थ ज्यामध्ये अन्नकण आणि बॅक्टेरिया असतात त्याला डेंटल प्लाक असे म्हणतात.
या मध्ये बॅक्टेरिया असतात आणि ते जलद पद्धतीने आपली संख्या वाढवतात त्यामुळे हिरड्यांना इन्फेक्‍शन होते.
इन्फेक्शन झाल्यानंतर हिरड्यांना सूज येते, हिरड्यांमधून रक्त येऊ शकते.
जर हे डेंटल प्लाक दहा ते पंधरा तासाच्या आत  ब्रश करून नाही काढलं तर त्यामध्ये क्षार जमा होतात आणि  कॅल्क्युलस किंवा टार्टर तयार होते.

एकदा का हे कॅल्क्युलस जमा झाले की ते ब्रशने सहजासहजी निघत नाही. त्याला काढण्यासाठी स्केलिंग ची गरज असते.

स्केलिंग का करतात..?

आपण दैनंदिन ब्रश केल्यामुळे दातांवर जमा होणारे अन्नकण आणि प्लाक स्वच्छ होत असते पण जी कडक घाण असते आणि जी घाण हिरडी च्या खाली असते त्याला ब्रशने स्वच्छ करणं शक्य नाही.
त्यासाठी डेंटिस्ट कडून स्केलिंग प्रोसिजर करून घेणे योग्य.
वेळीच उपचार करून घेतल्यास हिरडी आणि हाडांमध्ये होणारे इन्फेक्शन टाळता येते . जर इन्फेक्शन हाडापर्यंत गेलं तर काही वेळेस हिरड्यांची शस्त्रक्रिया करायची गरज पडू शकते.

स्केलींग कशी करतात..?

दातांची स्केलींग करण्याच्या दोन पद्धती आहेत.  हाताने वापरणारे विशिष्ट प्रकारच्या इंस्ट्रुमेंट ने किंवा अल्ट्रासोनिक मशीन द्वारे.
हाताने करण्यात येणारे स्केलींग मध्ये इन्स्ट्रुमेंट च्या सहाय्याने दात आणि हिरड्या मधील घाण आणि कॅल्क्युलस काढण्यात येते . यामध्ये वेळ थोडा जास्त लागतो . अल्ट्रासोनिक मशीन ने दात स्वच्छ जलद आणि चांगल्या प्रकारे होतात . 
अल्ट्रासोनिक मशीन मधून कंपन तयार होतात जे प्लाक आणि  कॅल्क्युलस ला काढतात. तसेच पाण्याचा वापर होतो ज्यामुळे दात स्वच्छ होतात. दोन्ही पद्धती अत्यंत वेदनारहित असतात . पेशंटला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही किंवा इंजेक्शन घ्यायची आवश्यकता नसते.


स्केलिंग कधी करावे..?

प्लाक  जमा होण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. आधी सांगितल्याप्रमाणे जर दहा ते पंधरा तासांमध्ये ती घाण स्वच्छ नाही केली तर कडक असे कॅल्क्युलस तयार होते.
इंडियन डेंटल असोसिएशनच्या अनुसार दर सहा महिन्यांनी आपल्या दंतरोग तज्ञांकडून तपासणी करून घ्यावे.
तुमचे दंतवैद्य तपासणीनंतर सांगू शकतील की तुम्हाला स्केलिंग ट्रीटमेंट ची आवश्यकता आहे की नाही.
यावेळेस हे विशेष नमूद करावेसे वाटते की दात स्वच्छ केल्यामुळे कधीही दात कमकुवत होत नाही किंवा हिरड्यांना त्रास होत नाही .याउलट दात स्वच्छ केल्यानंतर हिरड्यांना  बळकटी येते आणि हिरड्यातून रक्त येणे , व तोंडातून वास येणे ही थांबते.
नियमित पणे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने स्केलिंग ट्रीटमेंट करून घेतल्यास दातांचे व हिरडीचे आजार होण्याचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकते.


-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr.RahulBhadage

Comments