Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

" डॉक्टर साहेब, दात काढल्यावर माझे डोळे तर खराब नाही होणार...!"


रोज , म्हणजे अगदी रोजच, हा प्रश्न मला आणि माझ्या सारख्या अनेक दंत रोग तज्ज्ञांना विचारला जातो. " डॉक्टर साहेब, दात काढल्यावर माझे डोळे तर खराब नाही होणार, माझी दृष्टी तर नाही जाणार? " 

आणि याचे उत्तर एकच असते , " डोळ्यांचा व दातांचा तसा काही एक संबंध नाहीये, म्हणून काळजी करण्याचं काही कारण नाही. "

हा एक खूप मोठा गैरसमज आहे की  दात काढण्यानंतर दृष्टी जाते किंवा कमी होते. खरं तर दात काढल्यावर कधीच दृष्टी कमी होत नाही. याला काही शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत.
डोळ्याला व दाताला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी व संवेदनांचे ज्ञान असणारी नसा या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दात काढल्यानंतर डोळ्यावर काहीही परिणाम होत नाही . हा गैरसमज का पसरला याची काही कारणे सुद्धा आहेत.

ब-याचदा दाताची समस्या चाळिस या वय नंतर होत असतात. 40 या वया नंतरच बऱ्याच लोकांना जवळचे दिसायला अडचण निर्माण होते. अशावेळी डोळ्यांची तपासणी केल्यास जवळची दृष्टी खराब झाली आहे असं निदर्शनास येते. अशावेळी डॉक्टर चष्मा लावण्याचा सल्ला देतात. याचाच विपर्यास करून लोक निष्कर्ष काढला जातो की दात काढल्यामुळे दृष्टी कमी झाली आहे. परंतु, शास्त्रीयदृष्ट्या यात अजिबात तथ्य नाही.
कधीही , जर दात वाचण्यासारखा असला तर दात वाचवायलाच पाहिजे पण जर दात संपूर्णपणे खराब झाला असेल आणि त्यात इन्फेक्शन झाले असेल तर तो काढलेला योग्य असतो, ज्यामुळे ते इन्फेक्शन पसरत नाही आणि इतर दातांना खराब करत नाही.


आणि दात वाचवायचा का काढायचा हा निर्णय तुमचे दंतरोग तज्ञ योग्यप्रकारे घेऊ शकतात.
त्यामुळे जर दात काढायचं ठरलं तर दातामुळे दृष्टी खराब होईल हा गैरसमज मनातून काढून टाकावा आणि आपल्या दंतरोग तज्ञांचा सल्ला ऐकावा.
-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr. Rahul Bhadage

Comments

Post a Comment

आणखी माहिती साठी, आपले प्रश्न किवा संदेश कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा.