Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

ब्रेसेस (वायर), म्हणजेच दात सरळ करण्याची ट्रीटमेंटसाठी, दात काढण्याची गरज असते का ? -- डॉ राहुल भडागे


बरेच पेशंट विशेष करून त्यांचे आई-वडील विचारतात की ब्रेसेस ट्रीटमेंट सुरू करताना दात काढावेच लागतात का..?
याचे उत्तर आहे की प्रत्येक वेळी दात काढण्याची आवश्यकता नसते .जर दात न काढता ट्रीटमेंट करता आली तर ट्रीटमेंट लवकर होते परंतु काही वेळेला दात काढण्याची आवश्यकता असते.
जेव्हा तुम्ही ब्रेसेस आणि क्लिप्स ची ट्रीटमेंट घेतात तेव्हा दात काढण्यासाठी बरीच कारणे असू शकतात .
दातांमध्ये गर्दी,
तोंड बंद केल्यावर ही ओठ बंद न होणे,
जबड्याचा आकार कमी जास्त असणे इत्यादि..
अनेक रुग्णांमध्ये जबड्याचा आकार लहान असल्यामुळे सर्व दात व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे दातांमध्ये गर्दी निर्माण होते. अशा वेळेस ते दात दिसायला तर व्यवस्थित नसतातच पण त्यामध्ये अन्नकण अटकतात आणि कीड लागण्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेस दात काढण्याची गरज पडू शकते . दात काढल्यामुळे सर्व दात सरळ पंगतीत येतात. ते दिसायला  तर सुंदर असतातच पण त्यामुळे कीड लागण्याचे प्रमाण कमी होतं.

ब्रेसेस वा क्लिप्स ट्रीटमेंट बद्दल काही नेहमी विचारले जाणारे ७ प्रश्न

पूर्णपणे तोंड बंद केल्यावरही जर ओठ उघडे राहत असतील तर दात काढण्याची गरज पडू शकते. दात काढल्यानंतर दात मागे घेता येतात आणि त्यामुळे ओठ बंद होऊन सुंदर हास्य प्राप्त करता येते.
दात खूप पुढे असल्यास दात काढण्याची गरज पडते. पण काही वेळा जर दात थोडे पुढे असतील आणि दातांमध्ये फटी असेल तर दात काढण्याची गरज नाही.
आपण, डॉ भडागे श्री दातांचा दवाखाना व ऑर्थोडोंटिक सेंटर, सातपूर कॉलनी, नाशिक येथे
ब्रेसेसआणि क्लिप्स ट्रिटमेंट मध्ये आपला पहिला प्रयत्न दात न काढता दात सरळ करण्याचा असतो. निम्म्याहून अधिक रुग्णांची दाताची ट्रीटमेंट आपण दात न काढता करत असतो.

दात काढायचे, का नाही,याचा निर्णय आपण संपूर्ण तपासणी केल्यानंतर  व एक्स-रे चा अभ्यास केल्यानंतर घेत असतो. आणि तसंही , दात काढल्या नंतर कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, तसच दात काढल्या नंतर ची जागा, ट्रीटमेंट संपल्यावर पूर्णपणे बंद होत असते.


जर दात न काढता ट्रीटमेंट करण्याचे ठरले तर ट्रीटमेंट मधील आपला वेळ वाचतो आणि तसेच खर्चही कमी येतो.
आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात.
For appointment,

-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr.RahulBhadage

Comments