Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

ब्रेसेस क्लिप्स आणि वायरची ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर काय काळजी घ्यावी....? - डॉ राहुल भडागे

ब्रेसेस क्लिप्स आणि वायरची ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर काय काळजी घ्यावी....?

Precautions to take after starting of Orthodontic ( Clips and Braces ) treatment. 

(image credits- Google)

बऱ्याच विचारांती जेव्हा तुम्ही हा निर्णय घेतात की आता आपल्याला आपले वेडेवाकडे किंवा पुढे आलेले दात सरळ आणि सुंदर करायचे आहेत त्यावेळी ऑर्थोडोंटिक म्हणजेच क्लिप अँड ब्रेसेस च्या ट्रीटमेंटला सुरुवात होते.
पण खरी उपचार ब्रेसेस लावल्यानंतर सुरू होत असते. या उपचार पद्धतीमध्ये जेवढा डॉक्टरचा सहभाग असतो त्याहीपेक्षा जास्त उपचार घेणाऱ्या व्यक्तीने स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे , त्याने ट्रीटमेंट जलद आणि यशस्वीपणे होण्यास मदत होते.
ब्रेसेस लावल्यानंतर जर व्यवस्थित काळजी घेतली नाही तर अनेक प्रकारचे त्रास उदभवू शकतात.
दातांवर डाग पडू शकतात, कीड लागू शकते, हिरड्यांचे आजार वाढू शकतात.

©Dr. Rahul Bhadage

हे त्रास होऊ नये त्यासाठी काय काळजी घ्यावी...?

दोन वेळेला ब्रश करणे हे अत्यावश्यक असते.
उपचारादरम्यान डेंटिस्ट एक विशिष्ट प्रकारचे ऑर्थोडोंटिक ब्रश वापरायला सांगतात , ज्यामुळे दात स्वच्छ करणे सोपे जाते.
तसेच दोन दातांच्या फटीमध्ये आणि ब्रॅकेट्स आणि वायरमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी एक 'इंटरडेंटल ब्रश' वापरण्याचा सल्ला दिला जातो.
प्रत्येक वेळी काही खाल्ल्यानंतर व्यवस्थित चूळ भरायला पाहिजे.
माऊथ वॉश वापरण्याचा सल्ला दिला असेल तर त्याचाही वापर करावा.
दिवसातून एकदा तरी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळणी करावी.

ब्रेसेस (वायर), म्हणजेच दात सरळ करण्याची ट्रीटमेंटसाठी, दात काढण्याची गरज असते का ?
काहीही त्रास जाणवल्यास लगेच आपल्या डेंटिस्ट ला दाखवावे. कुठल्याही प्रकारचे घरगुती उपाय करू नये , तसेच ऑनलाइन इंटरनेटवर व्हिडिओ बघून कोणतेही उपाय करु नये.
त्यामुळे अजून त्रास होऊ शकतो.

काय खावे आणि काय खाऊ नये..?

ब्रेसेस ची ट्रीटमेंट चालू असताना कडक आणि चिकट खाणे टाळावे.
अशा प्रकारच्या खाण्यामुळे ब्रॅकेट्स तुटू शकतात आणि त्यामुळे उपचार लांबू शकतो.
जर काही कारणामुळे ब्रॅकेट तुटलेच तर तो तुकडा सांभाळून ठेवावा आणि आपल्या डेंटिस्ट ला लगेच दाखवावा.

काय खाऊ नये..?

कडक चॉकलेट,कणीस, चणे, फुटाणे,
कडक पापड, पाणीपुरी,
मैद्याचे पदार्थ.
तोंडात कुठेही वायर टोचत असल्यास लवकरात लवकर आपल्या डेंटिस्ट ला दाखवून ते दुरुस्त करून घ्यावे.
योग्य प्रकारे काळजी घेल्यास उपचाराचा कालावधी कमी होतो.तसेच आपल्याला लवकर सुंदर हास्य मिळते.


-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr. Rahul Bhadage

Comments