Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

कोणत्या वयापर्यंत दातांना ब्रेसेस आणि वायरची ट्रीटमेंट करता येते ? --डॉ राहुल भडागे

  • कोणत्या वयापर्यंत दातांना ब्रेसेस आणि वायरची ट्रीटमेंट करता येते ? 



Till what age we can do teeth straightening with Orthodontics clips and braces ?


अगदी सोप्या पद्धतीने सांगायचे झाले तर दातांना सरळ करण्यासाठी किंवा मागे घेण्यासाठी करावी लागणारी ब्रेसेसची ट्रीटमेंटला कुठलीही वयाची अट नाहीये.
अगदी पन्नाशीत सुद्धा आम्ही दातांना सरळ करण्यासाठी  डॉ.भडागे श्री दातांचा दवाखाना येथे ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंटची मदत घेतलेली आहे.
या उपचारासाठी फक्त एकच गोष्टीची आवश्यकता असते आणि ती म्हणजे मजबूत दात आणि मजबूत जबड्याचे हाड.
आधी असे सांगितले जायचे की दातांना सरळ करण्याचे वय 18 च्या अगोदर असते . पण नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अगदी पन्नाशीत सुद्धा दात सरळ करता येऊ शकतात. फक्त यासाठी दात मजबूत पाहिजे.

©Dr. Rahul Bhadage

उपचार कधी करता येत नाही?

जर दात कमकुवत असतील,  हालत असतील,  किंवा हिरड्यांचे आजार असेल तर ही ट्रीटमेंट करता येत नाही.
जर दात जास्त वेडेवाकडे असतील तरीही हे उपचार काही रुग्णांमध्ये  करता येत नाही. याचे कारण म्हणजे
वय वाढल्यानंतर दाताला धरून ठेवणार्या हाडांची व जबड्यांची वाढ थांबून गेलेली असते. त्यामुळे जर दात जास्त वेडेवाकडे असतील तर शस्त्रक्रिया हाच एक पर्याय असतो . तरीही प्रत्येक केस ही वेगवेगळी असते आणि व्यवस्थित तपासणी केल्यानंतरच आपण योग्य उपचार सांगू शकतो.
या सर्व गोष्टी असल्या तरीही अनेक वैज्ञानिक शोधानंतर आणि अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला आहे की ज्याप्रमाणे तरुण वयात वायर आणि ब्रेसेस च्या उपचारा मध्ये रिझल्ट मिळतात तशाच पद्धतीने वय वाढल्यावर ही आपल्याला उपचारा अंती सारखेच रिझल्ट दिसु शकतात.

हे सर्व असले तरी काही लोक वायर आणि ब्रेसेस ट्रीटमेंट का टाळतात ?

दुर्दैवाने काही गोष्टींमुळे प्रौढ व्यक्ती दात सरळ करण्यासाठी ब्रेसेसच्या उपचाराला टाळतात..
त्यातल्या काही कारणे फक्त गैरसमजामूळे आणि काही अज्ञानामुळे असतात. परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे या गोष्टी टाळता येतात.
काही लोकांना ब्रेसेस फक्त लहान मुलांसाठी असतात असं वाटते . त्यांना असे वाटते की हे दिसायला चांगले नसतात परंतु काही नवीन ब्रेसेस जवळजवळ अदृश्य असतात.
काहींना वाटते की ब्रेसेस लावल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल होऊ शकते. ते काही अंशी खरेही आहे परंतु काही गोष्टी सोडल्यास , जसे की खूप कडक आणि खूप चिकट पदार्थ,  तर खाण्यास खूप कमी असे बंधन असतात आणि ही छोटीशी किंमत आपल्याला कायमस्वरूपी च्या सरळ दातांसाठी मोजावीच लागणार.

©Dr. Rahul Bhadage

असे काही ब्रेसेस आहे की जे बिलकुल दिसत नाही ?

- सिरॅमिक किंवा क्लिअर ब्रेसेस (Ceramic or Clear Braces )
सिरामिक किंवा क्लिअर ब्रेसेस जवळजवळ अदृश्य असतात. बरेच वेळा तर समोर बोळणाऱ्याना लक्षात सुद्धा येत नाही की या व्यक्तीची काही उपचार चालू आहे.
व्यवस्थित स्वच्छता ठेवल्यास नियमित वापरल्या जाणार्या ब्रेसेस सारखेच हेही  रिझल्ट देतात.

इंविसलाईन Invisalign


नेहमीच्या ब्रेसेस पेक्षा हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये एक प्लास्टिकची प्लेट वापरल्या जाते, जी काही नियमित कालावधीनंतर बदलावी लागते. ज्या रुग्णांमध्ये अत्यंत कमी दातांच्या समस्या असतात, म्हणजे थोडेच दात वेडे वाकडे असतात, किंवा दातांमध्ये थोडी फट असते, त्यासाठी हे सर्वात उत्तम पर्याय आहे.
म्हणजेच काय तर कुठल्याही वयात ब्रेसेस ची ट्रीटमेंट घेता येऊ शकते , फक्त आपले दात आणि हाडे मजबूत पाहिजे तसेच मौखिक आरोग्य ही चांगले पाहिजे.


-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr. Rahul Bhadage

Comments

  1. I just want to say that all the information you have given here is awesome...great and nice blog thanks sharing..Thank you very much for this one. And i hope this will be useful for many people.. and i am waiting for your next post keep on updating these kinds of knowledgeable things.
    Best Braces Specialist in nashik

    ReplyDelete

Post a Comment

आणखी माहिती साठी, आपले प्रश्न किवा संदेश कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा.