Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

तंबाखूमुळे ह्या पाच प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात..-- डॉ राहुल भडागे

तंबाखूमुळे ह्या पाच प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात.
5 Health hazard of Tobacco 



तंबाखू उत्पादनात आणि सेवनात भारताचा जगात द्वितीय क्रमांक लागतो.WHO  च्या जागतिक अहवालानुसार भारतात 15 वर्षावरील, 35 टक्के लोक तंबाखूचे सेवन करतात.तसेच दरवर्षी दहा लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडतात.
महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार गेल्या अनेक वर्षांपासून  महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे , त्यामुळे गुटखा व तंबाखू च्या सेवनाचे प्रमाण कमी झाले आहे , तरीही लपून का असेना  गुटख्याचे सेवन तसेच त्याची विक्री चालू आहे हे जग जाहीर सत्य आहे.

सर्वांना माहीत आहे की तंबाखू आणि गुटख्याचे सेवन आरोग्यासाठी अपायकारक आहे. त्याबद्दल नियमित सांगण्यात येते . तरीही अनेक लोक या व्यसनाच्या अाधीन झालेले आहे.
ह्या लेखात आपण तंबाखूचे मौखिक  आणि शारीरिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजून घेणार आहोत.
©Dr. Rahul Bhadage

तोंडातून घाण वास येणे.. 
तंबाखू मग ती खाण्याची असो किंवा बिडी व सिगरेट मधून घेण्याची ,त्याचा वापर केल्यानंतर तोंडामध्ये त्याचा वास राहूनच जातो. तंबाखूच्या सेवनामुळे लाळ तयार होण्याची क्षमता कमी होते त्यामुळे तोंडाचे आजार उद्भवतात.

दाताचा रंग खराब होणे.. 
तंबाखूमध्ये निकोटिन चे प्रमाण जास्त असते. 
निकोटीन दाताच्या वरील थरा वर सहज शोषला जातो.निकोटिन जरी रंगहीन असला तरी जेव्हा तो ऑक्सिजनच्या संपर्कात येतो तेव्हा तो दाताचा रंग पांढरा पासून पिवळा करतो. जे लोक तंबाखू खातात त्यांच्या थुंकी मध्ये निकोटीन मिसळल्या जाते आणि त्यामुळे ते तोंडात जास्त वेळ राहते आणि यामुळे दात त्यांचा रंग पिवळा आणि नंतर काळा असा पडतो.

हिरडी चे आजार.. 
तंबाखूच्या सेवनामुळे हिरडीचे आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. याचे कारण निकोटीन दातांच्या हिरडी जवळ असणाऱ्या प्लाक (plaque) सोबत मिळून , हिरडी ला होणारा रक्त पुरवठा कमी करतो . त्यामुळे हिरडीला होणारे इन्फेक्शन वाढते. तोंड कोरडे पडते आणि त्यामुळे हिरडीला इजा होते.
तंबाखूच्या नियमित वापरामुळे हिरडीची झीज होते आणि त्यानंतर दाताला धरून ठेवणार्या हाडाची सुद्धा झीज होते.  अतिरिक्त झीज झाली तर दात हलायला लागतात आणि त्यानंतर दात गमवावा सुद्धा लागू शकतो. 



तोंडाचे कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढते.. 
80 ते 90 टक्के तोंडाच्या कॅन्सरचे कारण फक्त तंबाखूचे सेवन हेच असते.त्यामुळे जर आपल्याला स्वतःच्या तोंडाची काळजी असेल आणि कॅन्सरचा धोका टाळायचा असेल तर सर्वप्रथम तंबाखूचे सेवन थांबवायला पाहिजे.
तंबाखूमुळे कॅन्सर व्यतिरिक्त इतरही आजार होत असतात.
तंबाखूमुळे थुंकी तयार करणाऱ्या ग्रंथींना आजार होण्याची संभावना असते.


©Dr. Rahul Bhadage

 हृदयविकार...
तंबाखूमुळे ह्दय आणि रक्त वाहिन्‍यांचे विकार, ह्दयरोग, छातीत दुखणे, हृदयविकाराच्‍या झटक्‍यामुळे अचानक मरण येणे, स्ट्रोक म्हणजेच मेंदूचा विकार हे रोग सुद्धा होतात.
तंबाखू किंवा धूम्रपाना मुळे मधुमेह होण्‍याची शक्यता जास्त असते.

तर तंबाखू मुळे फक्त मौखिक च नाही तर संपूर्ण शरीराला त्रास होतो. पुढील लेखात तंबाखू च व्यसन कसं सोडवता येईल, त्याबद्दल माहिती घेऊ .

आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये विचारावे. 

©Dr. Rahul Bhadage

-- डॉ राहुल भडागे

Comments