Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

तंबाखू गुटखा चे व्यसन कसे सोडता येईल? - डॉ राहुल भडागे

तंबाखू गुटखा चे व्यसन कसे सोडता येईल ?
How to quit the habit of tobacco and gutkha? 

मागील लेखात आपण पाहिलं , की तंबाखू गुटखा च व्यसनामुळे अनेक प्रकार चे आजार होतात. 

©Dr. Rahul Bhadage

जर या सर्व आजार व अपाय टाळायच्या असतील तर काय करावे..?
याचे उत्तर सोपे आहे. तंबाखू गुटखा यांचं सेवन कमी करायचे आणि व्यसन सोडायचा प्रयत्न करायचा. 
तंबाखूचे व्यसन सोडणे प्रत्येकाला शक्य आहे, फक्त गरज असते ती आपल्या इच्छाशक्ती ची. खालील गोष्टी अमलात आणून आपण हे व्यसन सोडू शकतो.

कुठलेही व्यसन मुक्त होणे, ते मग तंबाखूचे असो वा इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीचे, लगेच एका दिवसात नाही होत . त्यासाठी वेळ जाऊ द्यावा लागतो. मनात दृढ इच्छाशक्ती असेल तर व्यसन सोडवण अधिक सोपं होतं. 

बरेच लोक तंबाखू सोडण्यासाठी एकच उपाय करतात. आणि ते म्हणजे जेव्हा त्यांना एक दिवस आत्मसाक्षात्कार होतो कि तंबाखू पासून आपल्याला त्रास होतो आहे त्यादिवशी ते जगजाहीर करतात की आजपासून मी तंबाखू सोडली. हे म्हणायला आणि ऐकायला जरी सोपे असले तरी त्यामुळे तंबाखू सुटणे हे दूरच राहते उलट एक आठवड्याच्या आतच पुन्हा तंबाखू गुटखा खाण्याची तलफ लागते आणि पुन्हा तो व्यक्ती त्या व्यसनाचा अाधीन होतो. 
मग करावे काय...?
त्यापेक्षा एक टाईम टेबल आखावा. जर तुम्ही रोज ७ ते ८ वेळा तंबाखू चे सेवन करत असाल , तर असे ठरवा, की पुढील आठवड्यात फक्त ५ वेळा घ्याल. ते ही जेव्हा खूप इच्छा होईल. असे दर आठवड्याला ठरवा, आणि तंबाखू चे प्रमाण कमी कमी करत जा. गरज वाटल्यास , तंबाखूच्या ऐवजी बडीशोप , आवळा किंवा लवंग खिश्यात ठेवा. जेवढ शक्य होईल, आणि इच्छा होईल, तेव्हा तंबाखूच्या ऐवजी यांचा वापर करावा. 

©Dr. Rahul Bhadage

काही लोकं निकोटिन असलेले  chewing gum खाण्याचा सल्ला देतात परंतु हे म्हणजे 'दगडापेक्षा वीट मऊ'. हे निकोटिन असलेले chewing gum मुळे काही प्रमाणात मदत होते , परंतु माझ्या मता प्रमाणे हे सतत वापरणे योग्य नाही. 

मी स्वतः माझ्या दवाखान्यात अनेक रुग्णांचे तंबाखू, सिगरेट ची सवय सोडवलेली आहे.
याची सुरुवात स्वतःपासून होत असते . 
अगोदर आपल्या जवळच्या म्हणजेच आई-वडील बायको मुलगा यांचा विचार करावा. जर तंबाखूच्या सेवनामुळे आपल्याला काही आजार झाले तर यांचे काय होणार हा विचार करावा. 
मनात भीती  नक्कीच वाटेल. आणि लक्षात ठेवा व्यसन सोडायला भीती पेक्षा मोठं औषध नाही आहे. 

स्वतःला नेहमी बजावून सांगा या व्यसनामुळे मला त्रास होत आहे. असं केल्यामुळे तुमच्या अंतर्मनाला सतत अशी जाणीव होईल हे व्यसन आपल्या शरीरासाठी अपायकारक आहे. आपल्या अंतर्मनाला हे समजत नाही की त्याला जे सांगितल्या जातंय ते बरोबर आहे का नाही. त्याला सतत एखादी गोष्ट सांगितली तर त्याला असे वाटते की तेच बरोबर आहे.
 असे सतत वारंवार स्वतःला सांगा की मला तंबाखू आवडत नाही, मला त्यापासून त्रास होतो. असं सतत सांगितल्यामुळे आपले मन आपण जे सांगतो त्याला आत्मसात करतो आणि व्यसन सोडवण्यास मदत होते.

©Dr. Rahul Bhadage

काही छंद आत्मसात करा आणि मन गुंतवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा तंबाखू गुटखा खाण्याची इच्छा होईल त्यावेळेस आपले मन दुसर्‍या कशात तरी रमावण्याचा प्रयत्न करा.  मग ते पुस्तक वाचन असो व्यायाम करणे, टीव्ही बघणे असो किंवा मोबाईलवर गेम खेळणे असो. इच्छा किंवा तल्लफ ही फक्त काही क्षणांपुरती असते 
 एवढा वेळ जर आपण मारून नेला तर काही वेळानंतर आपल्याला आपल्या व्यसनाची आठवण सुद्धा राहत नाही. 
 जेव्हा जेव्हा तल्लफ येईल  तेव्हा दीर्घ श्वास घ्या. एक ग्लास पाणी प्यावे.  व्यायाम केल्याने ही तल्लफ घालवण्यास मदत होते.

अशा गोष्टी ज्या पासून आपल्याला व्यसनाची आठवण होऊन ते सोडण्याचा प्रयत्न करावा. 
आपल्या घरी मित्रपरिवारात सर्वांना ठासून सांगावे की आता मी तंबाखूचे व्यसन सोडतो आहे. जर एखाद्या ठिकाणी , दुकानात किंवा पानटपरी जेथे तुम्ही नेहमी तंबाखू गुटखा खाण्यासाठी जात असाल, तर त्या ठिकाणी जाणे टाळावे. अश्या मित्रांपासून लांब राहावे जे तुम्हाला व्यसन करण्यासाठी आग्रह करतात. लक्षात ठेवा, जे मित्र तुम्हाला सांगत असतील की एकदा खाल्याने काही होत नाही, ते तुमचे खरे मित्रच नाहीये. 

जेव्हा अस वाटेल की आपल्या टाईम टेबल अनुसार आपल व्यसन कमी होतंय, तेव्हा स्वतःला पुरस्कृत करा. स्वतःला बक्षीस द्या.


व्यसन सोडण्याचा प्रवास नक्कीच सोपा नसतो. या मध्ये स्वतःची इच्छा शक्ती, आपल्या प्रियजनांचा  व मित्रांचा आधार आणि योग्य मार्गदर्शन  ची नितांत आवश्यकता असते. गरज वाटल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यसन सोडावे आणि निरोगी आयुष्य जगावे.

आपल्याही घरात , मित्र परिवारात किंवा ओळखी मध्ये कोणाला तंबाखू गुटखा च व्यसन असेल तर ती सोडवण्यासाठी त्यांना नक्की मदत करा. हा लेख त्यांच्या पर्यंत पोहचवा. आपल्या काही सूचना असल्यास किंवा काही विचारायचं असल्यास खालील कमेंट बॉक्स मध्ये आपले प्रश्न विचारावे. 

©Dr. Rahul Bhadage
-- डॉ राहुल भडागे

Comments

Post a Comment

आणखी माहिती साठी, आपले प्रश्न किवा संदेश कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा.