लहान मुलांमध्ये एकावर एक दात येत असल्यास काय करावे? -- डॉ राहुल भडागे
बऱ्याच वेळी पालक आपल्या लहान मुलांना दवाखान्यात दाखवायला तपासायला आणतात की मुलांचा दुधाचा दात पडलेला नाही आणि त्याच ठिकाणी मागे नवीन दात यायला सुरुवात झालेली आहे. बरेच पालक याला डबल आलेला दात असंही म्हणतात.
यापासून नक्कीच काही त्रास नसतो पण ते दिसायला खराब दिसते आणि त्यामुळे पालक चिंतित होतात.
हे का होत असावं याबद्दल हा लेख.
©Dr. Rahul Bhadage
असं का होतं?
दुधाच्या दाताच्या मुळा जवळच नवीन दात तयार होत असतो. एकदा का नवीन दात पूर्णपणे जबड्यामध्ये तयार झाला की तो दुधाच्या दाताला ढकलून त्या ठिकाणी आपली स्वतःची जागा घेत असतो.
परंतु दहा टक्के मुलांमध्ये दुधाचे दात न पडताच नवीन दात यायला सुरुवात झालेली असते. हे नवीन दात दुधाच्या दाताच्या आतील बाजूला यायला सुरुवात होत असतात, म्हणजेच जीभ आणि टाळूच्या बाजूने.
हे बऱ्याचदा सहा ते सात वर्षाच्या मुलांमध्ये होत असते आणि तेही फक्त पुढील दातांमध्ये.
यामुळे दातांमध्ये गर्दी निर्माण झालेली आहे, असे दिसते.
त्याबद्दल काही काळजी करण्याचे कारण?
जर तुम्हाला असे दिसत असेल की दुधाच्या दाताच्या मागे नवीन दात यायला सुरुवात झालेली असेल तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की चिंता करण्याचं काही कारण नाही.
आपल्या मुलांना दात आपोआप हलवून हलवून पाडण्यासाठी प्रोत्साहित करा.
मुलांना कच्चे फळ जसे पेरू सफरचंद खायला द्यावे. यामुळेसुद्धा दुधाचे दात लवकर पडण्यास मदत होते.
दुधाचा दात एकदा पडला की आपोआप नवीन दातासाठी जागा निर्माण होईल आणि तो नवीन दात आपली जागा व्यवस्थित घेईल.
आपल्या मुलाची दंतवैद्याकडे पहिली भेट केव्हा करावी?
©Dr. Rahul Bhadage
जर हे सर्व करूनही दुधाचा दात नाही पडला तर?
अशावेळी दंतवैद्य म्हणजेच डेंटिस्ट यांचा सल्ला घ्यावा. गरज असल्यास एक्स-रे काढून निदान करण्यात येते. एक्स-रे वरून हे लक्षात येते की दुधाच्या दात पडण्यात काही अडथळा तर नाही.
जर काही अडथळा नसेल तर डेंटिस्ट काही दिवस वाट पाहण्यास सांगू शकतात.
जर काही अडथळा असल्यास, दात डेंटिस्ट कडून.काढण्याची सुद्धा गरज पडते.
नैसर्गिक रित्या दुधाचे दात पडलेले केव्हाही चांगले. परंतु जर हालत असलेला दुधाचा दात पडत नसेल, आणि खाण्यामध्ये त्रास होत असेल, तर तो काढलेला चांगला.
दात किडू नये म्हणून काय काळजी घ्यावी..?
नवीन आलेला दात वेड्यावाकड्या असल्यास काय करावे?
एकदा का दुधाचा दात पडला की त्या ठिकाणी नवीन दात आपली जागा घ्यायला सुरुवात करतो.
सुरवातीला जरी तो दात वेडावाकडा दिसत असला, तरी कालांतराने तो आपली जागा व्यवस्थित घेतो. त्याला किमान एक वर्षापर्यंत लागू शकतो.
पण यानंतरही जर तो दात वेडावाकडा दिसत असेल तर काही उपचाराची गरज पडू शकते.
डॉ भडागे श्री दातांचा दवाखाना व ऑर्थोडोंटिक सेंटर, सातपूर कॉलनी, नाशिक येथे अशा प्रकारचे उपचार नियमित केले जातात.
नाशिक मध्ये दात सरळ करणे
लवकर निदान केल्यास भविष्यातील मोठी ट्रीटमेंट टाळता येऊ शकते.
तर या लेखाचा सारांश असा की जर तुम्हाला आपल्या मुलाच्या दुधाच्या दाताच्या मागे नवीन दात दिसत असेल तर चिंता करण्याचे काहीच कारण नाहीये. गरज वाटल्यास डॉ भडागे श्री दातांचा दवाखाना व ऑर्थोडोंटिक सेंटर,सातपूर कॉलनी, नाशिक येथे संपर्क साधून योग्य सल्ला घ्यावा.
©Dr. Rahul Bhadage
This is really helpful and informative, as this gave me more insight to create more ideas and solutions for my plan.keep update with your blog post.
ReplyDeleteteeth whitening for sensitive teeth in nashik
What impresses me most about pediatric dentistry is the patience shown during appointments. Even when children are nervous or restless, dentists take time to build trust. That kind of gentle approach ensures kids leave the clinic with a positive memory, which makes future visits so much easier. pediatric dentist
ReplyDelete