Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

दात काढल्यानंतर घ्यावयाची काळजी

दात काढल्यानंतर घ्यावयाची काळजी -- डॉ राहुल भडागे
Precautions to take after tooth extraction



दात काढल्यानंतर तोंडातील कापूस एक तासानंतर काढावे
दात काढला त्या दिवशी तोंडात जमा होणारी थुंकी व रक्त बाहेर न थुंकता गिळून टाकावे.
दात काढल्यानंतर चोवीस तासापर्यंत चूळ भरून नये किंवा गुळणी करू नये.
याचं कारण म्हणजे जर दात काढल्यानंतर थुंकल किंवा गुळण्या केल्या तर रक्ताची खपली तयार होत नाही किंबहुना ते जागेपासून निघून जाण्याची शक्यता जास्त असते.
जर ती खपली निघून गेले किंवा काही कारणामुळे तयार नाही झाली तर त्या ठिकाणी जखम भरण्यासाठी वेळ जास्त लागून जातो आणि ड्राय सॉकेट ( Dry Socket ) तयार होतं व ते खूप वेदनादायी असतं.

©Dr. Rahul Bhadage

दात काढल्या जागेवर जीभ किंवा बोट लावू नये.
दात काढला त्यादिवशी दात काढलेल्या जागेवर बाहेरच्या बाजूने बर्फानी किंवा गार पाण्याने शेकावे.
दात काढला त्यादिवशी गरम व कडक पदार्थ खाण्याचे टाळावे थंड व नरम पदार्थ जखम झालेल्या बाजूच्या विरुद्ध बाजूनी खावे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासानंतर मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या कराव्या
या गुळण्या दिवसातून तीन वेळेस पुढील तीन दिवसासाठी करावे
दात काढल्यानंतर त्या जागी सूज येऊ शकते त्यामुळे घाबरून जाऊ नये .
सिग्रेट अथवा विडी ओढू देऊ नये तसेच तंबाखू गुटखा व तत्सम पदार्थ खाण्याचे टाळावे.
Carbonated कोल्ड ड्रिंक्स घेणे टाळावे.
स्ट्रॉ ने काहीही घ्यायचे नाही.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत .
काही त्रास झाल्यास घरगुती उपाय न करता डॉक्टरांना भेटावे
भुलीमुळे सुन्न झालेले ओठ व जीभ दाताखाली चावले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
जर तुमची अक्कलदाढ ऑपरेशन करून काढलेली असेल तर वरील काळजी घ्यावी तसेच खालील गोष्टी ध्यानात ठेवाव्यात.
काही प्रमाणात सुज ही अपेक्षित आहे .
ती चार ते पाच दिवसात कमी होते.
ऑपरेशन नंतर तपासणीसाठी दोन दिवसानंतर यावे तसेच ऑपरेशन च्या जागी दिलेले टाके काढण्यासाठी सात दिवसानंतर यावे.
तोंडात टाके दिल्यामुळे तोंड कमी उघडते त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून तो दुखण्याचा व्यायाम करावा
ऑपरेशनच्या जागी अन्नकण अडकणार नाही याची काळजी घ्यावी.
आपल्या काही सूचना असल्यास किंवा काही विचारायचं असल्यास खालील कमेंट बॉक्स मध्ये आपले प्रश्न विचारावे. 

©Dr. Rahul Bhadage
Dentist at Nashik
-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr. Rahul Bhadage

Comments