Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

रात्री दात खात असल्यास किंवा दातावर दात घासत असल्यास काय करावे ? --डॉ राहुल भडागे

रात्री दात खात असल्यास काय करावे ?


बरेच लोक कळत-नकळत दिवस भरात अनेक वेळा दातावर दात घासतात.
असं दात खाण्याच्या प्रकाराला ब्रुक्सिझम Bruxism असं म्हणतात.
कधीतरी काही वेळापुरता दातावर दात घातल्यामुळे तसा काही त्रास होत नसतो परंतु जर असं दात घासण्याचा प्रकार नियमितपणे होत असेल, विशेषतः रात्रीच्या वेळी , तर दाताला इजा होऊ शकते आणि त्यापासून इतर मौखिक आजार उत्पन्न होऊ शकतात.

याचं कारण काय?

दात खाण्याची सवय म्हणजेच ब्रुक्सिझम तणावपूर्ण जीवनशैली मुळे होतो, आणि त्यातही हे रात्रीच्या वेळी जास्त होत असतं. अनेक वेळा
एखादा दात नसल्यावर,
वेडेवाकडे दात असल्यावर किंवा
दातावर दात व्यवस्थित बसत नसतील तरीही दात घासण्याचे प्रमाण वाढतं.

मला  ब्रुक्सिझम Bruxism आहे हे कसे लक्षात येईल?

अगोदर सांगितल्याप्रमाणे दात घासण्याचा प्रकार रात्री होतो. आणि बर्‍याच लोकांना हे माहितही नसतं की आपल्याला ब्रुक्सिझम Bruxism  आहे. तरी काही लोकांमध्ये असं बघण्यात आला आहे की ज्या लोकांना ब्रुक्सिझम Bruxism असतं, त्यांना सकाळी उठल्यावर काही प्रमाणात डोकेदुखी किंवा जबड्याचे स्नायू (Muscles) दुखत असतात. काही लोकांच्या मान आणि पाठीमध्ये ही त्रास होतो. आपल्या परिवारातील सदस्य सांगतातच की रात्री दात घासले जातात की नाही.

काही लहान मुलांमध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेस दातावर दात घासण्याची सवय असते. शक्यतोवर हे दोन ते दहा वर्षाच्या मुलांमध्ये बघण्यात येते.

ब्रुक्सिझम Bruxism मुळे काय त्रास होतो?

लगेच काही त्रास जाणवत नाही पण जर अनेक महिने किंवा वर्षांपासून ब्रुक्सिझम Bruxism चा त्रास असेल तर
दात घासले जातात,
दात ढिले होतात,
तसेच काही वेळा दात तुटण्याची ही शक्यता असते.
काही रुग्णांमध्ये तर आम्ही असेही बघितलं आहे की दात इतके घासल्या जातात की दातांचे फक्त मुळच  उरतात.
जर नकली दात बसवले असतील तर त्यांचेही वारंवार निघण्याचे प्रमाण वाढतं.
यामुळे फक्त दातांचीच झीज होत नाही तर जबड्याला , जबड्याचे स्नायू आणि जबड्याच्या सांध्याला पण त्रास होतो.
दात खाण्याच्या सवयींमुळे झालेली दातांची झीज


तर हा त्रास कमी करण्यासाठी काय करावे?

सर्वप्रथम आपल्या दंतवैद्य Dentist कडून तपासून घ्यावे. गरज असल्यास आपल्याला माऊथ गार्ड ( mouth guard ) वापरण्याचा सल्ला दिला जातो. हे माऊथ गार्ड आपल्याला रात्री झोपताना घालायचं असतं. त्यामुळे दातांच्या झीजण्याचे प्रमाण कमी होतं.
जर माऊथ गार्ड वापरण्याचा सल्ला दिला असेल तर तो नियमित, न चुकता, आपल्या डेंटिस्ट यांच्या सल्ल्यानुसार वापरावा.

माऊथ गार्ड

जर ताणतणावामुळे ब्रुक्सिझम (Bruxism) होत असेल  तर तो कमी करण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी तुम्ही योगा , प्राणायाम किंवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊ शकतात.
गरज असल्यास औषधे ही दिल्या जातात.

जर दात वेडेवाकडे असेल आणि त्यामुळे जर दात झिजण्याचे प्रकार होत असेल, तर ते दात सरळ करून आपण ब्रुक्सिझम Bruxism  कमी करू शकतो.
त्यासाठी आपण ब्रेसेस आणि वायरची ट्रीटमेंट ने दात सरळ करू शकतो.

ब्रेसेस वा क्लिप्स ट्रीटमेंट बद्दल काही नेहमी विचारले जाणारे ७ प्रश्न

जर एखादा दात नसेल किंवा दातावर दात व्यवस्थित बसत नसेल तर त्या ठिकाणी तो दात बसवून आपण हा त्रास कमी करू शकतो.

इतर काही उपचार ज्यामुळे माझ्या काही रुग्णांना फरक पडलेला आहे ते खालील प्रमाणे आहे.

रात्री झोपायच्या आधी आपल्या आवडीचे पुस्तक वाचावे किंवा संगीत ऐकावे, त्यामुळे मन शांत राहतं आणि शांत झोप लागते . असं आढळून आलेला आहे की हे केल्यामुळे ब्रुक्सिझम काही प्रमाणात कमी झालं आहे.

झोपायच्या आधी कोमट पाण्याने आंघोळ केल्याने जबड्याचे स्नायू ला आराम मिळतो. हे नसेल करायचा तर एक रुमाल कोमट पाण्यामध्ये भिजवून आपल्या जबड्या भोवती लावावा यामुळेसुद्धा आराम मिळतो.

नियमितपणा योगा , प्राणायाम आणि व्यायाम करावा.

दारू गुटखा तंबाखू या व्यसनांपासून लांब राहावे.

जर आपल्याला काम करताना काही चावण्याची सवय असेल जसे की पेन्सिल, पिना तर ते टाळावे.

खूप खडक आणि चिकट पदार्थ खाणे टाळावे.

ब्रुक्सिझम हा खरं तर खूप मोठा विषय आहे. याचं निदान होणं खूप महत्वाचं असतं. एकदा निदान झाला की आपण त्याचं कारण शोधून त्या पद्धतीने त्याचा उपचार व्यवस्थित प्रकारे करू शकतो. म्हणून वेळीच तपासणी करून पुढील त्रास वाचावा. 

सातपूर , नाशिक येथील श्री दातांचा दवाखान्यात ब्रुक्सिझम ची योग्य तपासणी करून , योग्य तो सल्ला देऊन , आपलं त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.  

Best dental clinic in Nashik


आपल्या अजून काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात.

©Dr. Rahul Bhadage

-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८

Comments