Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

माऊथ वॉश वापरण्याचे फायदे आणि नुकसान

माऊथ वॉश वापरण्याचे फायदे आणि नुकसान -- डॉ राहुल भडागे


अनेक लोक ब्रश केल्यानंतर माऊथ वॉश  वापरतात.
माऊथ वॉश नेहमी ब्रश केल्यानंतर वापरतात.
माऊथ वॉश चे बरेच फायदे असतात तसेच काही तोटेही असतात , जे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पुढच्या वेळेस माऊथ वॉश वापरण्याआधी त्याचे फायदे आणि तोटे लक्षात घेतल्यास अधिक चांगले राहील.

©Dr. Rahul Bhadage

माऊथ वॉश चे  फायदे .

दातांची किड कमी करण्यास मदत करतो. माऊथ वॉश ने गुळण्या केल्यानंतर तोंडामध्ये असणारे बॅक्टेरिया जे दाताला व तोंड मध्ये इतर ठिकाणी चिटकलेले असतात त्यांना धुऊन काढत.जर तुमच्या माऊथ वॉश मध्ये Fluoride असेल तर त्यामुळे कीड लागण्याचा प्रमाण अजून कमी होऊ शकतं आणि दातांना बळकटी प्राप्त होते.
माऊथ वॉश मुळे हिरड्या राहतात. याचं कारण म्हणजे माऊथ वॉश मुळे बॅक्टेरियाचं प्रमाण कमी होतं की जे हिरड्यांना इन्फेक्शन सूज आणण्यासाठी कारणीभूत असतात.
काही लोकांमध्ये तोंडाला आणि श्वासाला वास येतो .  माऊथ वॉशच्या वापरामुळे हा वास कमी होऊ शकतो.
तोंड आलं असल्यास माऊथ वॉश ते बरे करण्यास मदत करतात. हे वापरल्यामुळे जखम लवकर भरते. फक्त ते माऊथ वॉश अल्कोहोल फ्री असायला हवं.
©Dr. Rahul Bhadage
याठिकाणी हे लक्षात घ्यायला पाहिजे हे सर्व फायदे फक्त माऊथ वॉश वापरल्यामुळे होत नाहीये . तर त्याच्या सोबत नियमित व योग्य पद्धतीने ब्रश करणे ही गरजेचं आहे.
फक्त माऊथ वॉश ने हे सर्व फायदे नाही मिळवता येत.

माऊथ वॉश चे तोटे

माऊथ वॉश हे काही तोंडाचे व श्र्वासाचा दुर्गंधीचे उपचार नाहीये. तात्पुरता स्वरूपात तोंडाचा वास कमी होतो, पण त्याचे मूळ कारण कमी होत नाही. मुख्यतः तोंडाचे वास यायचं कारण
हिरडी चे आजार व calculus हे असत. योग्य उपचार घेतल्यास तोंडाचे दुर्गंधी कायम स्वरूपात जाते, व माऊथ वॉश चा वापर कमी करता येत.
माऊथ वॉश मध्ये बऱ्याच प्रमाणात अल्कोहोल असत, जे किटाणूनाशक असतं, पण त्यामुळे बऱ्याच लोकांना तोंडामध्ये जळजळ होऊ शकते
. जर अल्कोहोल च प्रमाण खूप जास्त असेल आणि तोंड आलेलं असल्यास जखम भरण्यास वेळ जास्त लागतो.
माऊथ वॉश हे गिळण्यासाठी योग्य नसत. जर काही कारणांनी ते पोटात गेलं तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि याच कारणामुळे माऊथ वॉश हे लहान मुलांना , ज्यांचे वय सहा वर्षाचा आत आहे त्यांना ते देऊ नये .
माऊथ वॉशमुळे दातावर डाग पडू शकत. हे डाग बऱ्याचदा काळया रंगाचे असतात. हे डाग दात स्वच्छ करण्याचा उपचाराने ( scaling and polishing) स्वच्छ करता येतात.
माऊथ वॉश मुळे काही लोकांच तोंड कोरडे पडू शकते. त्या मध्ये असलेलं अल्कोहोल हे तोंड कोरडे पडण्यासाठी कारणीभूत असतं. यामुळे दातांना ठणक लागू शकते. दाताला किड लागल्याचं प्रमाणही वाढू शकत.
काही आजारांमध्ये तोंडाचा व श्र्वासाचा विशिष्ट असा वास येतो. जर आपण माऊथ वॉश वापरून तो वास लपवला तर त्या वेळेपुरता तोंडाचा वास कमी होतो पण आत मध्ये असलेला आजार कमी होत नाही. जर खूपच घाण वास येत असेल तर माऊथ वॉश वापरण्यापेक्षा आपल्या डेंटिस्ट दाखवावे जेणेकरून त्या वासाचे नेमके कारण ओळखता येऊ शकते.

माऊथ वॉश वापरण्याची योग्य पद्धत

माऊथ वॉश वापरण्याचे फायदे आहेत, पण जर योग्य पद्धतीने वापरले नाही, तर त्याचे फायदे काहीच होत नाही. या उलट नुकसान जास्त होऊ शकते.
तर , माऊथ वॉश वापरण्याची योग्य पद्धत काय आहे?
माऊथ वॉश दोन वेळा वापरणे चांगले, म्हणजेच ब्रश केल्या नंतरच माऊथ वॉश वापरायला पाहिजे.
माऊथ वॉश किती घ्यायचं , हे त्याच्या कंपनी वर अवलंबून असते. त्यासाठी माऊथ वॉश च्या बाटलीवरील सुचनेचे पालन करावे किंवा आपल्या डेंटिस्ट ला  विचारावे.
ब्रश केल्यानंतर माऊथ वॉश ५  ते १५ ml तोंडात घेऊन , कमीत कमी ६० सेकंद  तोंडात फिरवायला पाहिजे.
हे थोड जोरात व खळखळून केल्यास उत्तम . माऊथ वॉश हे सर्व दातांमध्ये व दातांच्या फटीमध्ये पोहचायला पाहिजे. 
जर ६० सेकंद पेक्षा कमी तोंडात ठेवलं, तर माऊथ वॉश चा काहीच उपयोग होत नाही. एका मिनीटानंतरच त्याचे काम सुरू होते.
हे सर्व केल्यानंतर माऊथ वॉश थुकुन देणे.
त्यानंतर पुढचे दहा मिनिट पाण्याने चूळ भरू नये , तसेच काही खाऊ नये. याने माऊथ वॉशला त्याचे काम करायला पुरेसा वेळ मिळतो आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो.
अल्कोहोल नसलेले म्हणजेच Alcohol free Mouth wash वापरायला पाहिजे. या साठी आपण आपल्या डेंटिस्ट चा सल्ला  घेऊ शकतात.
©Dr. Rahul Bhadage

इथे अजुन एक गोष्ट नमूद करायला हवी, की माऊथ वॉश  हे प्रत्येकानेच वापरावे असे नाहीये. प्रत्येकालाच त्याची गरज नसते. साध्या कोमट पाण्यात मिठाच्या गुळण्या केल्यास त्याचेही बरेच फायदे होतात.
वरील सर्व वाचून तुमच्या लक्षात आले असेल की माऊथ वॉश वापरायचा का नाही याचे एक उत्तर असू शकत नाही. कुठला माऊथ वॉश वापरावा तसंच किती वेळ वापरावा , यासाठी आपल्या डेंटिस्ट चा सल्ला घेणे कधीही चांगले. 

तर या लेखाचा सारांश हा की माऊथ वॉश हे काही योग्य व नियमित ब्रश करायला पर्याय नाही. माऊथ वॉश हे तुमच्या ब्रशला पूरक असते, पर्याय नाही.

माऊथ वॉश बद्दल अजुन काही शंका प्रश्न असल्यास खालील कमेंट बॉक्स मध्ये लिहावे. 
Dentist at Nashik
-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८
©Dr. Rahul Bhadage

Comments