Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

डॉक्टर...! कोणते टूथपेस्ट चांगले आहे?

कोणते टूथपेस्ट चांगले आहे?

आतली  गोष्ट

आपण टीव्ही किंवा इतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या जाहिराती पाहतो आणि कोणती टूथपेस्ट वापरायची याबाबत लोक गोंधळून जातात. अनेकदा रुग्ण शेवटच्या उपचारानंतर विचारतो

सर,

कोणते टूथपेस्ट चांगले आहे? त्यामुळे दात खराब होत नाहीत?

किंवा दात ठीक असतील तरी कोणती पेस्ट वापरावे?

हे असं विचारणं झालं जसं परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी काय करावे हे शिक्षकांना विचारणे

कोणत्या कंपनीच्या पेनने पेपर लिहावा ?

- जसे कागद लिहिण्यासाठी चांगल्या कंपनीचा पेन नसून तुमचे ज्ञान आणि पेनने चांगले लेखन आवश्यक आहे, तसेच दातांच्या स्वच्छतेसाठी चांगला ब्रश महत्त्वाचा आहे आणि टूथपेस्ट नव्हे तर ब्रश करण्याच्या योग्य पद्धती महत्त्वाचं आहे.

होय, अशी काही औषधी टूथपेस्ट आहेत ज्यांचा वापर दातांच्या संवेदनशीलता सारख्या काही समस्यांसाठी असतात मात्र त्यांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यावरच करावा.
©Dr. Rahul Bhadage


-- डॉ राहुल भडागे
डॉ भडागे श्री दातांचा दवाखाना व इंप्लान्ट सेंटर
सातपूर कॉलोनी, नाशिक

Comments

  1. खूपच छान सर परंतु प्रश्न तोच पड़तो की ब्रश कसा असावा व टूथपेस्ट मधे कोणता कनटेंट नसवा व कोणता असला तर टीथ ची हनी नहीं होनार... 🙏

    ReplyDelete

Post a Comment

आणखी माहिती साठी, आपले प्रश्न किवा संदेश कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा.