Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

दातांची लस - फ्लोराईड उपचार Vaacine For Teeth - Fluoride Treatment

फ्लोराईड उपचार ही दातांना किडण्यापासून रोखण्यासाठी केलेली उपचार पद्धती आहे.

फ्लोराईड उपचार दातांवरील कीडेला नियंत्रित ठेवण्यास आणि ते निरोगी ठेवण्यास मदत करते. एखाद्या व्यक्तीच्या दातांसाठी व मौखिक आरोग्यासाठी फ्लोराईड उपचाराचे अनेक फायदे आहेत. 
फ्लोराईड मुळे दातांमधली कीड लागण्याचे प्रमाण कमी होते.
कीड कमी म्हणजेच महागड्या दातांच्या उपचारांचा खर्च टाळणे, हिरड्यांच्या आजाराच्या समस्या टाळणे आणि दात जास्त काळ निरोगी ठेवणे .


दाताच्या सर्वात बाहेरील थराला ENAMEL असं म्हणतात. हा इनामल शरीरातला सर्वात मजबूत भाग असतो तरीही त्यामध्ये बारीक सूक्ष्म अशा फटी असतात.
ह्याच फटींमधून कीड लागू शकते आणि पुढे वाढू शकते. 
फ्लोराईड उपचारामुळे, ह्या फटींमधली पोकळी भरल्या जाते,त्यामुळे नंतर कीड वाढण्याचे प्रमाण कमी होते. काही research मधून समोर आलेल्या निष्कर्षावरून असे सिद्ध होते की
फ्लोराईड उपचार केल्यानंतर कीड लागण्याचे प्रमाण 50-60% पर्यंत कमी होते.

©Dr. Rahul Bhadage

फ्लोराईड उपचार कसे करतात?
१९४२ पासून अनेक प्रकारे फ्लोराईड उपचार करण्यात येत आहे.
सर्वात जास्त फायदेशीर उपचार पद्धती म्हणजे Topical Fluoride Application. ह्या मध्ये दातांवर ब्रश च्या साह्याने फ्लोराईडचे औषध
लावले जाते. 
10 ते 15 मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते.
ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं injection किंवा त्रास होत नाही.
ही संपूर्ण वेदना रहित उपचार प्रक्रिया आहे. ह्या औषधाची चवही चांगली असते, त्यामुळे मुलांना सुद्धा उपचार घेताना आवडतं.
या उपचारासाठी खर्च सुद्धा खूप कमी लागतं.

ह्या उपचारानंतर एक तास काहीही खाऊ नये , त्यामुळे दातांवर फ्लोराईडचा थर टिकून राहतो आणि कीड लागण्याचे प्रमाण कमी होते.


फ्लोराईड उपचार कधी करावे? 
फ्लोराईड उपचाराचे अनेक फायदे आहेत. लहान मुलांमध्ये वर्षातून एकदा केल्यास त्याचे फायदे जास्त दिसून येतात. मोठ्यांमध्ये सुद्धा दात स्वच्छ केल्यानंतर फ्लोराईड उपचार केल्यास कीड कमी होण्यास मदत होते. Teeth sensitivity म्हणजेच दातांचा थंड गरम चा त्रास असल्यास फ्लोराईड उपचार केल्यानंतर बराच फरक जाणवतो.

शेवटी दंतरोग तज्ज्ञ म्हणून सांगावेसे वाटते की दात दुखल्यानंतर मोठ्या मोठया ट्रीटमेंट करून जास्त खर्च करण्यापेक्षा वर्षातून एकदा दात स्वच्छ करून फ्लोराईड उपचार करून घेतल्यास जास्त फायदेशीर आहे. खर्चही वाचतो आणि शेवटी निसर्गाने दिलेला original दात तो original दात. त्याची सर कशालाच येऊ शकत नाही.


-- डॉ राहुल भडागे
९८६०८८४६४८

Comments

  1. I really enjoyed your post! I think it's an interesting topic you tackled.Invisible Braces for Straight Teeth in nashik I am always eager to read more. Well done!

    ReplyDelete

Post a Comment

आणखी माहिती साठी, आपले प्रश्न किवा संदेश कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा.