Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

पक्के स्क्रूचे दात म्हणजेच डेंटल इम्प्लांट चे फायदे..


डेंटल इम्प्लांट आपल्याला कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतात?

दात नसण्याचे अनेक कारणे असू शकतात. कारण काहीही असो ते आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये, सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यात फरक घडवून आणतात .
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या खाण्यापिण्यावरती बंधन येतात.
चारचौघात बोलण्यात आणि हसण्यात कमीपणा येतो .कवळी वापरल्यामुळे काही प्रमाणात या गोष्टींमध्ये मदत तर होतेच ,पण ते नैसर्गिक दातासारखे नसतात. पण डेंटल इम्प्लांट (dental implants) त्याबाबतीत नेहमी वरचढ असतात. डेंटल इंप्लान्ट अत्यंत नैसर्गिक आणि खरे दातांसारखे वाटतात.

डेंटल इंप्लान्ट मुळे आपल्या वागण्या बोलण्यात, चारचौघात वावरण्यात आणि खाण्यापिण्यामध्ये अमुलाग्र बदल घडू शकतात.

डेंटल इम्प्लांट मुळे आपल्या आयुष्यात खालील प्रकारे बदल घडवून येतात.



जे आवडतं ते खाऊ शकतात - डेंटल इम्प्लांट फक्त दिसण्यासाठीच महत्त्वाचे नसतात ,त्यामुळे आपले खाण्यापिण्याची क्षमता सुद्धा वाढते. ते ही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता.
दात नसल्यामुळे आपण आपल्या मनासारखं खाऊ शकत नाही पण डेंटल इम्प्लांट मुळे आपण आपलं मनासारखं खाऊ शकतात . चावून चांगल्या प्रकारे खाण्यामुळे आपल्या तब्येतीत चांगला बदल घडून येतो.

आपले हास्य पुन्हा मिळवा -हे सर्वांना माहीतच आहे की आपली स्माईल आपल्या पर्सनॅलिटीचा महत्त्वाचा भाग आहे .
डेंटल इम्प्लांट मुळे आपण आपला गमावलेला कॉन्फिडन्स पुन्हा प्राप्त करू शकतात .
विचार करा कुठल्याही लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात आपल्या गमावलेल्या दातांबद्दल विचार न करता आपल्याला हसता बोलता ,खाता येईल आणि हसून फोटो काढता येऊ शकतं.

कवळी पासून मुक्तता- कवळी हे गेलेले दात परत मिळवण्याचा अनेक वर्षांपासून उपयुक्त साधन आहे. परंतु कवळी वापरण्याचे काही तोटे ही आहे. जसे त्यांना रोज स्वच्छ करावे लागते .रात्री झोपताना काढून ठेवावे लागते. तसेच ते जबड्यात फिक्स न केल्यामुळे निघण्याची शक्यता असते. बरेच लोकांना हे त्रासदायक वाटू शकतं .
याच्या विपरीत डेंटल इम्प्लांट अत्यंत नैसर्गिक सुंदर आणि सगळ्यात उत्तम कार्यक्षमता असणारे दात असतात. त्यामुळे आपल्याला कधीही खाताना, हसताना किंवा बोलताना दात पडण्याची किंवा बाहेर निघण्याची भीती नसते.

स्पष्ट बोलता येतं - डेंटल इम्प्लांट मुळे आपल्या शब्दांचे उच्चारण अनेक पटीने सुधारते. गमावलेल्या दातांमुळे बोलण्यात अडचणी होते तसेच काही शब्द उच्चारता येत नाही. डेंटल इम्प्लेंट हाडांमध्ये फिक्स असल्यामुळे बोलण्यास काही त्रास होत नाही , तसेच ज्या लोकांचा सामाजिक वावर आहे जसे वक्ता लोक किंवा शिक्षक, त्यांना बोलण्यामध्ये सहज सुलभता येते.

मौखिक आरोग्य सुधारणा - डेंटल इम्प्लेंट नैसर्गिक दातांसारखेच असतात .त्यामुळे त्यांची काळजी घेणे ही खूप सोपं असतं .
त्यांना आपल्या नेहमीच्या दातांसारखंच ब्रश करता येतं आणि स्वच्छ ठेवता येतं. दात स्वच्छ असल्यामुळे तोंडाचे आणि पोटाचे आजार कमी होण्यास मदत होते.


थोडक्यात डेंटल इंप्लान्ट मुळे आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडून येतात. मग ते आपल्या चारचौघात वावरण्यात ,बोलण्या ,खाण्यापिण्यात किंवा फोटो काढण्यात असो.

सातपूर नाशिक येथे डॉक्टर भडागे यांचे श्री दातांचा दवाखाना व डेंटल इम्प्लांट सेंटर येथे डेंटल इंप्लान्ट बद्दल सविस्तर माहिती मिळू शकते .
तसेच आपली अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी खालील नंबर वर व्हाट्सअप किंवा कॉल करू शकतात.


Dr. Bhadage's Shree Dental Clinic And Implant Center

Shop no. 27,28,33

Dr. Ambedkar Market, MHB Colony, Satpur Colony, Nashik, Maharashtra 422007

9860884648

Best dentist in Nashik 

Comments