Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

हिरडीतून रक्त येत असल्यास काय करावे. --डॉ. राहुल भडागे

Daatancha davakhana, daatancha dawakhana, nashik dentist

जर आपल्या हिरडीतून रक्त येत असेल तर याचा अर्थ हिरड्यांमध्ये नक्कीच काहीतरी समस्या असू शकते.
आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे जोरात ब्रश करणे , काही जखम होणे , गरोदरपणात , तसेच काही आजारांमध्ये व काही औषधांमुळे हिरड्यांमधून रक्त येऊ शकते.
आधीच्या लेखाची लिंक

माझ्या हिरडीतून रक्त का येत आहे ? 
हिरड्यांतून रक्त का येत आहे, याचे कारण शोधणे जास्त महत्त्वाचे आहे. एकदा कारण समजल्यावर आपल्याला योग्य उपचार करता येतात.
दात व तोंड व्यवस्थित स्वच्छ करणे.
स्वच्छ दात व हिरड्यामुळे रक्त येण्याचे प्रमाण कमी असते.
शास्त्रीय व योग्य पद्धतीने ब्रश केल्यास दात व हिरड्या मध्ये साचलेली घाण व्यवस्थित निघते व त्यामुळे हिरड्यांचे आजार कमी होतात.

नेहमी मऊ केसांचा टूथब्रश वापरावा.

ब्रश हळूवारपणे आणि सर्व दातांच्या सर्व बाजूने करावा.
रोज दोन वेळा दोन-तीन मिनिटं ब्रश करणे पुरेसे असते. तसेच दर तीन महिन्यांनी टूथब्रश बदलावा.
दोन दातांमधील जागेत अडकलेले अन्न वा घाण काढण्यासाठी फ्लाँस चा वापर करावा.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्याने  हिरडीची सूज कमी करण्यात मदत होते.


व्यसन थांबवणे.

तंबाखू गुटखा तसेच धूम्रपान यामुळे हिरड्यांचे आजार वाढतात. हे व्यसन सोडल्यास दात व हिरड्यांचे आजार कमी होतात.

विटामिन सी युक्त आहार.

संत्री-मोसंबी गाजर तसेच इतर अनेक फळांमधून आपल्याला विटामिन सी मिळते. विटामिन सी योग्य प्रमाणात घेतल्यास हिरड्यांचे आजार कमी होतात.

विटामिन के युक्त आहार.

हिरव्या भाजीपाल्यामध्ये विटामिन के चे प्रमाण चांगले असते. विटामिन के सुद्धा हिरडीच्या स्वास्थ्यासाठी गरजेचे असते.

काहीवेळा छोट्याशा जखमेमुळे सुद्धा हिरडीतून रक्त येऊ शकते. अशा वेळेस एखादा बर्फाचा खडा एका कपड्यात गुंडाळून जखमेवर लावले तर रक्त थांबते.

डेंटिस्ट दंतरोग तज्ञ ला केव्हा दाखवावे?

वरील उपाय करूनही चार ते पाच दिवसात हिरडीतून रक्त नाही थांबल्यास दंतरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. दात व हिरडी मध्ये प्लाक व कॅल्क्युलस जमा झाल्या मुळे रक्त येत राहते. अशा वेळेस दात व हिरड्या स्केलिंग या ट्रीटमेंटने स्वच्छ करतात. वर्षातून दोनदा स्केलिंग केल्यास दातांचे व हिरड्यांचे आजार होण्याचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होते.

डॉ. राहुल भडागे

दंतरोग तज्ज्ञ
डॉ आंबेडकर मार्केट,
तुळसाई हॉस्पिटल समोर,
सातपूर कॉलनी ,
सातपूर, नाशिक
मो. : ९८६०८८४६४८

Comments