Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

काही लोकांचा हिरड्यांचा रंग काळा का असतो ?

प्रत्येक व्यक्तीच्या कातडीचा रंगा मध्ये फरक असतो. हा रंगाचा फरक मेलानिन नावाच्या पिगमेंट मुळे होत असतो. हे मेलॅनिन पिगमेंट कातडीला रंग देण्याचे काम करत असतं.


त्याच प्रकारे हिरड्यांमध्ये सुद्धा मेलानिन पिगमेंट असतात जे हिरडीला रंग देत असतात.

काही लोकांमध्ये या मेलानिन पिगमेंटेशन चा प्रमाण जास्त असल्यामुळे हिरड्यांना थोडा काळसर असा रंग येतो. यामुळे असा काही विशेष त्रास नसतो फक्त ते दिसायला चांगला नाही वाटत.

जर तो काळा मेलानिनचा पट्टा काढायचा असेल, तर डीपिगमेंटेशन ( Depigmentation) नावाची उपचार पद्धती असते. हे उपचार करण्याचेही बरेच प्रकार आहेत जसे शस्त्रक्रिया करून , लेझर द्वारे.

हे उपचार करून हिरड्यांचा रंग पूर्ववत गुलाबी रंगावर येत असतो.फक्त काही लोकांमध्ये 2 , 3 वर्षानंतर काही प्रमाणात मेलानिन पिगमेंट पुन्हा येण्याचे प्रकार बघण्यात येत.


हिरड्यांना काळा रंग येण्याची अजूनही काही कारणे आहेत. त्यातील काही कारणे खाली दिलेले आहेत.

१.सिगारेट किंवा विडी चे व्यसन असल्यामुळे हिरड्यांना काळपट रंग येतो
२.काही औषधांमुळे ही हिरड्यांना काळा रंग येतो. Minocycline नावाच्या औषधांमुळे हा रंग येऊ शकतो.
३.आधी दाताला कीड लागल्यानंतर त्या खड्ड्यांमध्ये चांदी भरायचे . काही काही वर्षांनंतर त्या चांदी मुळे शिर्डी चा रंग काळा पडून जायचं. याला Amalgam tatoo असं म्हणतात. सध्या दाताच्या रंगाचे कंपोझिट नावाचे सिमेंट वापरत असल्यामुळे हे Amalgam tatoo  होण्याचे प्रमाण बरेच कमी झालेला आहे. 
४. काही आजारांमध्ये सुद्धा हिरड्यांचा रंग काळा होत असतो. जसं Peutz- Jeghers Syndrome आणि Addison's Disease.


आणि हो, एक सांगायचं राहिलं, हिरड्यांना घासून, किंवा काही औषध लाऊन हा रंग जात नाही. हा, काही वेळासाठी लाल रंग येईल, पण तो रक्ताचा रंग असेल. तेव्हा थोड जपून. 🤪

दातांवर काळा रंगाचा थर किंवा घाण साचली असल्यास स्केलींग उपचार ने स्वच्छ करता येत


Image credits - Google

-- डॉ राहुल भडागे
©Dr. Rahul Bhadage

Comments