Skip to main content

Featured

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. --डॉ राहुल भडागे

या 5 पद्धतीने आपले गमावलेले दात पुन्हा मिळवू शकतात.. These 5 methods of replacing teeth can bring your smile back दात महत्वाचे असतात. ते फक्त आपल्याला दिसण्यासाठी कामाचे नसतात तर मौखिक आरोग्य आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी ही महत्त्वाचं काम करतात . जर तुमच्या तोंडामध्ये एक किंवा अनेक दात नसतील तर त्यामुळे बोलणं आणि चावणं अवघड होतं. मागील लेखात आपण पाहिलं की दात नसल्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात.  लिंक या लेखात आपण बघणार आहोत की दात काढल्यानंतर किंवा गमावल्या नंतर त्या ठिकाणी आपण नवीन दात कुठल्या पद्धतीने बसवू शकतो. १. डेंटल इम्प्लान्ट दंत रोपणाची सर्वात नवीन पद्धत म्हणजे डेंटल इम्प्लान्ट. डेंटल इम्प्लान्ट करण्यासाठी एक छोटीशी शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जबड्या मध्ये  दाताच्या मुळा सारखे इम्प्लांट टाकतो आणि त्यावर नवीन दात बसवतो. नवीन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया वेदनारहित असते , तसेच बसवलेले दात अनेक वर्ष चालतात. दिसण्यासाठी सुद्धा हे बसवलेले दात नैसर्गिक दिसतात. २. फिक्स्ड ब्रिज फिक्स्ड ब्रिज म्हणजेच

अक्कलदाढ म्हणजेच wisdom tooth पासून होणारा त्रास , घरगुती उपाय आणि बरच काही..

 

अक्कलदाढ म्हणजेच wisdom tooth पासून होणारा त्रास , घरगुती उपाय आणि बरच काही..
- डॉ राहुल भडागे


अक्कलदाढ (wisdom tooth ,third molar ) पासून होणारा त्रास बऱ्याच लोकांनी अनुभवला असेल . इतर कुठल्याही दुखण्यापेक्षा अक्कलदाढीचा त्रास खूप जास्त असतो, हे ज्यांनी सहन केलेला आहे ते याला दुजोरा देऊ शकतात.
या लेखात आपण अक्कलदाढ पासून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती घेऊ, ते बरे करण्यासाठी घरगुती उपाय तसेच डॉक्टरांकडील उपाय आणि त्याबद्दल होणारा खर्चाबद्दल माहिती घेऊ.

अक्कलदाढ वयाच्या 17 ते 25 या दरम्यान येत असते . त्यामुळेच या दाढीला अक्कलदाढ असं नाव पडलंय. आणि या दाढीचा आणि अकलेचा काही एक संबंध नाही आहे . खरं तर ही तिसरी दाढ असते .
बऱ्याचदा काही लोकांना पंचवीशी नंतरही अचानकपणे तोंडामध्ये अक्कलदाड दिसू लागते.

अक्कलदाढीमुळे होणारे त्रास
अक्कलदाढ नेहमी शेवटी येत असते आणि ती येताना जर जागा नसेल तर त्याला येण्यास अडथळा निर्माण होतो. ती पूर्णपणे येऊ न शकल्यामुळे ती आपल्या पुढच्या दातांना धक्का देते ,त्रास देते आणि येण्याचा प्रयत्न करते ,याचमुळे वेदना सुरू होतात.
वेदना सौम्य, मध्यम ते तीव्र स्वरूपाचे असू शकतात. तसेच वेदना काही काळापुरता राहून काही काळ थांबतात आणि पुन्हा काही दिवसांनी किंवा आठवड्याने सुरू होतात . वेदना दाताच्या अवतीभवती हिरड्यांना आणि बाजूच्या दातांना होते. काही लोकांमध्ये वेदना डोकं कान आणि मानेपर्यंत होते. काही वेळेला सूज येते जी दाताच्या जवळ असू शकते, बाहेरून दिसू शकते किंवा पसरून कानापर्यंत जाऊ शकते . तसेच जेवायला त्रास होऊ शकतो, गिळायला त्रास होऊ शकतो काहींना तोंड उघडायला सुद्धा त्रास होतो.

अक्कलदाढीच्या वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय
कोमट पाण्यात मिठाच्या गुळण्या केल्यास वेदना कमी होतात. दिवसातून कमीत कमी चार वेळेस गुळण्या करायला पाहिजे .
गरज असल्यास वेदनाशामक औषध घेऊ शकतात.

एवढं करूनही जर आराम मिळत नसेल तर जवळच्या दंतरोग तज्ञ ला भेटून सल्ला घ्यावा.

दवाखान्यात आल्यावर काय करतात
दवाखान्यात आल्यावर सर्वप्रथम डेंटिस्ट दुखणारे दाताचा एक्स-रे घेऊन बघतात. एक्स-रे मुळे दाताची पोझिशन,दातामध्ये असलेले इन्फेक्शन आणि इतर माहिती मिळण्यास मदत होते.
जर ती दाढ सरळ असेल तर तिचा येण्याचे  काही संभावना असतात पण जर ती दाढ आडवी असेल आणि तिचे येण्याचा चान्स नसेल तर तिला काढण्याचा सल्ला दिला जातो.
काही वेळेला आमच्या बघण्यात आलेला आहे की अक्कलदाढ आडवी जरी असली तरी ती शांत असते. त्यावेळेस तिचा काही त्रास नसतो . हा कालावधी काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंत असू शकतो ,पण कालांतराने ती जेव्हा पुन्हा येण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती त्रास द्यायला सुरुवात करते. त्यावेळेस पुन्हा आधी सारखेच वेदना सुरू होतात किंबहुना ते आधी पेक्षा जास्त ही असू शकतात. याच कारणामुळे पेशंट नेहमी सांगत असतात की अगोदर सहा महिने किंवा एक वर्षाआधी अक्कलदाढ दुखली होती आणि त्यानंतर गोळ्या घेतल्यावर काहीच त्रास झाला नाही आणि एक दोन दिवसापासूनच पुन्हा त्रास सुरू झाला.

©Dr. Rahul Bhadage

अक्कलदाढीचा कायमस्वरूपी उपचार
जर अक्कलदाढ आडवी असेल आणि तिचा येण्याचा काहीच संभावना नसतील, ती किडली असेल किंवा संपूर्ण जबड्याला त्रास देत असेल आणि वारंवार सूज येत असेल तर तिला काढण्याचा सल्ला दिला जातो.
बरेचदा अक्कलदाढ मध्ये अन्नसाचून ती तर खराब होतेच पण ती तिच्या पुढच्या दाताला ही खराब करायला सुरुवात करून टाकते अशा वेळेस अक्कलदाढ काढलेलीच चांगले असते.
अशा वेळेस एक छोटी सर्जरी करून अक्कलदाढ काढण्यात येते . कशा प्रकारची सर्जरी असेल हे त्यात दाताच्या पोझिशन वर अवलंबून असते . ह्या सर्जरीला पंधरा मिनिट ते 1 तास लागू शकतं.

याचा खर्चही अक्कलदाढ काढण्यास किती अवघड आणि किचकट आहे त्यावर अवलंबून असतं. तरी साधारणतः अक्कलदाढ काढण्याचा खर्च 1500 ते 5000 पर्यंत येऊ शकतो.
जरा अक्कलदाढ पूर्णतः आलेली असेल तर सर्जरीची गरजही लागत नाही . काही वेळेला अक्कलदाढ सरळ असते पण त्यावर हिरडी आलेली असते. त्या हिरडी मध्ये अन्नकण अडकल्यामुळे सूज येते. अशा वेळेस फक्त हिरडी चा तुकडा काढून सुद्धा दात बरा करू शकतो. ह्या procedure ला operculectomy असं म्हणतात.
डॉ.भडागे श्री दातांचा दवाखाना, सातपूर कॉलनी येथे operculectomy ह्या प्रोसिजरला electro cautery machine द्वारे वेदनारहित पद्धतीने करण्यात येते. यामुळे टाके न लागता ही सर्जरी करता येते .तसेच जखम लवकर भरते.

अक्कलदाढ काढल्यानंतर जखम लवकर भरण्यासाठी टाके देण्यात येतात .यामध्ये विरघळणारे टाके किंवा सात दिवसांनी काढावे लागणारे टाके टाकण्यात येतात . ह्या सर्जरी नंतर काही प्रमाणात सूज येणे हे अपेक्षित असतं.
अक्कलदाढ काढल्यानंतर काय काळजी घ्यावी या संबंधित अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून वाचावे.
दात काढल्यानंतर घ्यावयाची काळजी

  दात काढल्यानंतर घ्यायची काळजी

तरी अक्कलदाढी बद्दलचा काही त्रास असल्यास आणि ते घरगुती उपचाराने बरं होत नसेल तर आपल्या जवळच्या डेंटिस्टला दाखवून उपचार केलेले कधीही चांगले. आपल्यासाठी योग्य काय आहे आणि काय करण्याची आवश्यकता आहे हे व्यवस्थित तपासून सांगता येऊ शकते

- डॉ राहुल भडागे

©Dr. Rahul Bhadage

डॉ भडागे श्री दातांचा दवाखाना व इंप्लान्ट सेंटर
सातपूर कॉलनी
नाशिक

Dr. Bhadage's Shree Dental Clinic and Implant Center

Shop no. 27
Dr. Ambedkar Market, MHB Colony, Satpur Colony, Nashik, Maharashtra 422007
9860884648

For directions and patients feedback


https://g.co/kgs/NY5divK



Comments

Post a Comment

आणखी माहिती साठी, आपले प्रश्न किवा संदेश कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा.